Job Opportunity: तुमच्या गावातच नोकरीची संधी, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मोठी भरती

Last Updated:

Job Opportunity: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यात कोतवाल आणि तलाठी भरती होणार आहे.

Job Opportunity: तुमच्या गावातच नोकरीची संधी, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मोठी भरती
Job Opportunity: तुमच्या गावातच नोकरीची संधी, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मोठी भरती
रायगड: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आपल्या गावात खास संधी उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोतवाल व पोलिस पाटील संवर्गातील रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अलिबाग येथे माहिती दिली.
रायगड जिल्हा रोजगार मेळावा, अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम अलिबागमधील नियोजन भवन येथे झाला. यावेळी जितके सक्षम प्रशासन, तितक्या गतिमान सेवांचा लाभ नागरिकांना देता येतो. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. रोहयोमंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांच्या कार्यक्रमात ज्या बाबींचा समावेश केला होता, त्यामध्ये जिल्ह्याने 100 टक्के कामकाज पूर्ण केले आहे. गतवर्षी सरळ सेवेने 216 उमेदवारांना ग्राम महसूल अधिकारी, 18 उमेदवारांना महसूल सहायक, तर पुरवठा विभागात 41 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.
advertisement
रायगडमधील 11 कर्मचाऱ्यांना शिपाई व महसूल सहायक संवर्गातून ग्राम महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली. तर 178 अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारित सेवेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला. 61 अधिकाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी 125 उमेदवारांना (नवनियुक्त अनुकंपा) एमपीएससी, नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Job Opportunity: तुमच्या गावातच नोकरीची संधी, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मोठी भरती
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement