आयएमडीबी रिपोर्टनुसार, दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये 13 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान 13 ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग राहिला आहे. पठाण आणि जवाननंतर अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सलमानने आपल्या करिअरमध्ये 11 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 'टायगर जिंदा है' हा त्याचा ब्लॉकबस्टर ठरलेला शेवटचा चित्रपट. या चित्रपटानंतर त्याचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात ते कमी पडले.
advertisement
OTT Must Watch Movie : शेवटची 20 मिनिटं तुम्हाला हादरुन सोडतील, खतरनाक सस्पेन्स थ्रिलर
अमिताभ बच्चन यांनी 12 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचा शेवटच्या 'कल्कि 2898' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळविले होते. धर्मेंद्रने आपल्या करिअरमध्ये 8 ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. तर ऋषि कपूर यांनीदेखील 8 दिले होते.
आमिर खान विचारपूर्वक प्रत्येक चित्रपट निवडत असतो. आतापर्यंत तो 8 ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग राहिला आहे. सनी देओलने 7 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तर राज कपूर यांनी 6 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मनोज कुमार 6 ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग राहिले आहेत. तर शशि कपूर यांनी 6 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. याचाच अर्थ दिलीप कुमार यांनी सर्वाधिक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक आघाडीचे कलाकर वेबसीरिज आणि प्रयोगशील चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चाहत्यांकडून भरभरून कौतुक होतंय. पण ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग असणाऱ्या सेलिब्रिटींचा थाट मात्र वेगळाच असतो. या कलाकारांच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.