शाहरूख खानच्या डंकी कडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा होत्या. कारण पठाण आणि जवान सिनेमानं केलेल्या कमाईचा आकडा लक्षात घेता डंकी हा सिनेमा किती कमावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पठाण आणि जवानच्या तुलनेत डंकी हा सिनेमा वेगळ्या थाटणीचा असल्याचं पाहायला मिळालं आहे. शाहरूखचा एक वेगळा अंदाज या सिनेमा पाहायला मिळतोय.
advertisement
हेही वाचा - 'डंकी' का ठेवलंय शाहरुख खानच्या चित्रपटाचं नाव? या शब्दाचा खरा अर्थ वाचून व्हाल चकित
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, शाहरूखच्या डंकी सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई केली आहे. डंकी हा शाहरूखचा या वर्षातील सर्वात लो बजेट सिनेमा आहे. सिनेमाची ओपनिंग देखील या वर्षातील सर्वात कमी ओपनिंग होती. डंकीची अँडवान्स बुकींग पाहायला गेल्यास एकूण 15कोटींचं अँडवान्स बुकींग करण्यात आलं होतं. अँडवान्स बुकींच्या दुप्पट कमाई सिनेमानं पहिल्या दिवशी केली.
शाहरूखच्या डंकीला प्रभासचा सालार टक्कर देणार. सालारा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आज म्हणजेच 22 डिसेंबरला रिलीज झाला आहे. डंकीच्या तुलनेत साराला सर्वोधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी प्रभासचा सालार भाव खाऊन जाणार असं दिसत आहे. डंकी सिनेमात शाहरूख खानबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी, सतीश शाह आणि विक्रम कोचर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
शाहरूखच्या जवाननं पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली होती. तर पठाण सिनेमानं 57 कोटी कमावले. एनिमल या सिनेमानं 63.8 कोटी तर टायगर 3 नं पहिल्या दिवशी 43 कोटींची कमाई केली होती. या सगळ्यात शाहरूखच्या डंकीनं 30 कोटींची सर्वात कमी ओपनिंग केली आहे.