मुंबई : अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 ऑगस्ट रोजी कॅन्सरनं निधन झालं. तिच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तिचा नवरा अभिनेता शंतनु मोघे याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. शंतनुने प्रियाची कायम साथ दिली. तिच्या कठीण काळात तो तिच्याबरोबर होता. हातातील सगळी काम सोडून त्याने त्याचा संपूर्ण वेळ फक्त प्रियासाठी दिला होता. प्रियाच्या निधनाच्या काही दिवस आधीच त्याने नवं काम होती घेतलं होतं. मात्र प्रियाच्या अचानक जाण्याने त्याने काही दिवस काम थांबवलं. प्रियाच्या निधनाच्या जवळपास 15 दिवसांनी शंतनुने पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. जे काम त्याने थांबवलं होतं ते त्याने पुन्हा सुरू केलं.
advertisement
प्रियाच्या निधनाच्या आधी शंतनु मोघेनं स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत त्याने एन्ट्री घेतली होती. त्या मालिकेचा पहिलाच एपिसोड टेलिकास्ट झाला आणि दुसऱ्याच दिवशी प्रियाचं निधन झालं. या मालिकेतील शंतनुचा पहिला एपिसोड प्रियाने पाहिला होता. रात्री तिने एपिसोड पाहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं निधन झालं अशी माहिती तिचा भाऊ आणि अभिनेता सुबोध भावे याने एका मुलाखतीत दिली होती.
शंतनुने स्वत:ला सावरलं
पत्नी प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता शंतनु मोघेनं त्याचा नवा प्रवास सुरू केला. प्रियाच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मात्र त्याने आता स्वत:ला सावरलं असून तो पुन्हा कामाला लागला आहे. शंतनुने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.
अभिनेता अभिजीत खांडकेकर यानं दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शंतनुबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, त्याने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे. मी फाइन आहे असं तो म्हणतोय. तो लवकरात लवकर यातून बाहेर यावा अशी आमची इच्छा आहे.
शंतनु मोघे 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत तो मंजिरीच्या भावाचा रोल करत आहे. शंतनुला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मालिकेत मंजिरीने रायाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाला शंतनुचा विरोध आहे. शंतनुच्या एन्ट्रीनं मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे मालिका आणखी रंजक होणार आहे.