तब्येत ढासळली, बोलण्याची ताकदही संपली; अभिजीतनं सांगितलं प्रियाच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Abhijeet khandkekar - Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेच्या शेवटच्या दिवसांत ती कोणालाही भेटली नाही. या काळात प्रियाबरोबर नेमकं काय घडलं याबद्दल अभिनेते अभिजीत खांडकेकरनं सांगितलं.
मुंबई : अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन झालं. तिच्या निधनानंतर तिच्याबरोबर काम केलेल्या अनेक कलाकार आणि मित्र मंडळींनी अनेक आठवणी शेअर केल्यात. प्रिया तिच्या आजारपणाच्या काळात कोणालाही भेटत नव्हती. कॅन्सरमुळे तिला 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका अर्ध्यातच सोडावी लागली. कॅन्सरबद्दल कळल्यानंतरही काही दिवस प्रिया मालिकेत काम करत होती. या काळात तिला तिचा मित्र आणि सहकलाकार अभिजीत खांडकेकरनं यानं मोठी साथ दिली होती.
लोकमत फिल्मीशी बोलताना अभिजीत म्हणाला, "एका आजारपणाच्या निमित्तानं चेकअप केलं तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. आपण सगळेच ऑपरेशन वगैरे या सगळ्या गोष्टींना घाबरतो. त्यावेळेस तिने धास्तीने ती गोष्ट मला सांगितली. मी तिला दिलासा दिला. तेव्हा प्रियाची एक अडचण होती की हे मला कोणाला सांगायचं नाहीये तू मला त्याच्यात हेल्प कर. सेटवर एखादी व्यक्ती का बरं उगाच दमतेय, का बरं सुट्ट्या घेतेय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. अचानक प्रिया का सुट्टी घेतेय, आज तर नाटकाचा प्रयोगही नाहीये. तिला शक्यतो ते सगळ्यांना कळू द्यायचं नव्हतं. तर या सगळ्या लपवालपवीत मी तिला मदत करत होतो. शंतनुनंतर मी एकटा होता की ज्याला हे माहिती होतं."
advertisement
अभिजीत पुढे म्हणाला, "त्या काळात तिला जास्तीत जास्त कम्फर्टेबल करता येईल असा आमचा प्रयत्न होता. पण नंतर त्या ट्रिटमेन्टमुळे तिची तब्येत नोटिसेबल अशी जाणवायला लागली. प्रिया तेव्हा दोन व्यावसायिक नाटकं करत होती. त्यात एक डेलीसोप आणि मोनिकासारखं कॅरेक्टर करत होती. खूप बोलायचं तावातावाने, आक्रसताळेपणाचे सीन होते. अशा ट्रिटमेन्टमध्ये लोक दिवस दिवस झोपून काढायचे तिथे ही स्वत: ड्राइव्ह करत शूटींग करायची. दोन व्यावसायिक नाटकं करायची. तिथे ती पल्लेदार वाक्य, 3-3 तास सलग उभं राहायची."
advertisement
अभिजीतने सांगितलं की, "रंगभूमीवर रमणारी प्रिया, पल्लेदार वाक्य इतकी सफाईदारपणे घेणारी प्रिया शेवटच्या काही दिवसांत तिला दोन वाक्यही बोलणंही कठीण झालं होतं. कितीही नाही म्हटलं तरी एक जवळची व्यक्ती, मित्र म्हणून तिने अजून थोडं असायला हवं होतं. पण असंही वाटतं की ती सुटली. तिच्यासोबतच्या आठवणी डोक्यात जाणं शक्य नाहीये. पण अजूनही खरं वाटत नाहीये की ती नाहीये."
advertisement
मालिकेतून तिला एक्झिट घ्यावी लागली. तोपर्यंत सगळ्यांना माहिती झालं होतं. पण त्या काळात ती ठीक होती. शंतनु आणि प्रियाला सगळ्यांना प्रेमानं खाऊ घालायला, आदरातीर्थ्य करायला आवडायचं, त्यांनी मालिकेच्या संपूर्ण कलाकारांना एकदा घरी बोलावलं. आमचं खाणं पिण झालं. भरपूर गप्पा मारल्या, गाणी गायली आम्ही. तिने मला सांगितलं होतं की, पुढे किती शक्य होईल मला माहिती नाही, पण मला सगळ्यांना एकदा घरी बोलवायचं होतं, सगळे आले तर छान वाटतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
तब्येत ढासळली, बोलण्याची ताकदही संपली; अभिजीतनं सांगितलं प्रियाच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत काय घडलं?