महाराष्ट्राची लाडकी डान्सिंग क्वीन गौतमी पाटील आणि 'इंडियन आयडॉल' विजेता अभिजीत सावंत हे दोघे एकत्र दिसणार आहेत. नुकताच सोशल मीडियावर या दोघांचा एक AI जनरेटेड व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये निळ्याशार समुद्राच्या किनाऱ्यावर आणि हिरव्यागार बागांमध्ये ही जोडी रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात एकाच वेळी उत्सुकता निर्माण झाली आहे की, हे दोघे एकत्र येऊन नेमके काय करणार आहेत?
advertisement
समुद्रकिनारी अभिजीत सावंत-गौतमी पाटीलचा रोमान्स
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने अभिजीत सावंतसोबतचा एक साधा सेल्फी पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कमिंग सून' असे लिहिले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या धमाकेदार प्रोजेक्टची चर्चा सुरू झाली होती. आता या व्हायरल 'AI रोमान्स' व्हिडिओमुळे त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
'बिग बॉस' च्या घरात आपली कमाल खेळी दाखवणारा अभिजीत सावंत आणि आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील ही अनपेक्षित जोडी एकत्र आल्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. समुद्रकिनारीचा हा रोमान्सचा व्हिडिओ नेमक्या कोणत्या गाण्याचा किंवा प्रोजेक्टचा भाग आहे? अभिजीत सावंत आता गौतमीसोबत कोणते नवीन गाणे घेऊन येत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत, कारण हा प्रोजेक्ट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
