Dharmendra: मनाला भळभळती जखम पण तरीही जगाच्या नजरेत नवऱ्याला पडू दिलं नाही, धर्मेंद्रसाठी पहिल्या पत्नीने केलेली शॉकिंग गोष्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dharmendra Passed Away : १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. यानंतर प्रकाश कौर यांची अवस्था बिकट झाली होती.
advertisement
advertisement
advertisement
१९७० मध्ये 'तुम हसीं मैं जवान' या चित्रपटापासून धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली होती आणि १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. धर्मेंद्र यांनी धर्म बदलून हे दुसरे लग्न केले होते, कारण ते पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हते. यामुळे धर्मेंद्र यांच्यावर वुमनायझरचा शिक्का बसला.
advertisement
आपल्या पतीवर होणारी चिखलफेक पाहून प्रकाश कौर संतापल्या होत्या. त्यांनी १९८१ मध्ये दिलेले विधान आजही चर्चेत आहे. प्रकाश कौर म्हणाल्या, "एका महिला म्हणून हेमा मालिनी कोणत्या परिस्थितीतून जात असेल, ते मी समजू शकते. तिला तिच्या कुटुंबियांना आणि मित्रांना तोंड द्यावे लागत असेल. पण मी जर हेमाच्या जागी असते, तर मी कधीच असे केले नसते!"
advertisement
advertisement
जेव्हा धर्मेंद्र यांना इंडस्ट्रीत 'वुमनायझर' म्हटले गेले, तेव्हा प्रकाश कौर यांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट इंडस्ट्रीतील दुटप्पीपणावर बोट ठेवले. प्रकाश कौर यांनी सवाल केला, "माझ्या नवऱ्याला वुमनायझर म्हणायची मीडियाची हिंमत कशी झाली? आज अर्धी इंडस्ट्री हेच करत आहे. फक्त माझ्या पतीवरच प्रश्न का?"
advertisement
advertisement