Creta चं मार्केट होणार जाम, टाटाने टाकला मोठा डाव; Tata sierra ची किंमत इतकी कमी, सेफ्टीमध्येही किंग!
- Published by:Sachin S
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
तब्बल ३४ वर्षांनंतर आपल्या लाडक्या टाटा सियारा Tata Sierra ला मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेरीस जगासमोर आणलं आहे.
advertisement
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून टाटा सियाराची किंमत किती असणार याबद्दल तर्क वितर्क लढवले जात होते, अखेरीस टाटाने यावरून पडदा बाजूला केला आहे. टाटा सियाराची किंमत एक्स शोरूम ११.४९ लाख इतकी ठेवण्यात आली आहे. Tata Sierra 2025 ची बुकिंग १६ डिसेंबरपासून सुरू होईल. तर डिलिव्हरी ही १५ जानेवारी २०२६ पासून होणार आहे.
advertisement
advertisement
Tata Sierra 2025 मध्ये दोन नवीन इंजिनचा समावेश केला आहे यामध्ये एक 1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टरसह येतोय. तर दुसरं इंजिन हे 1.5-लिटर रेवोट्रॉन नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर इंजिन आहे जे म्यॅनुअल आणि DCA (डुअल क्लच ऑटोमॅटिक) दोन पर्याय दिले आहे. या शिवाय 1.5-लिटर क्रायोजेट डिझेल इंजिनचा सुद्धा पर्याय दिला आहे पण अजून तो लाँच केला नाही.
advertisement
Tata Sierra 2025 ही नवीन ARGOS आर्किटेक्चरवर तयार केली आहे. या कारचं डिझाईन एक क्लासिक आणि भावनेनं जोडलेलं आहे. ३४ वर्षांपूर्वीची सियारा आणि आताची नवीन Tata Sierra या दोघांचं कनेक्शन जोडण्यात आलं आहे. त्यामुळे ही Tata Sierra 2025 ही वेगळी आहे. या सियारामध्ये थ्री-क्वार्टर ग्लास कन्सेप्ट, आधुनिक फ्लश ग्लास पॅनल दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, ड्रायव्हरसाठी मेमेरी फंक्शनसह पॉवर-एडजस्टेबल फ्रंट सीट, वायरलेस चार्जिंग, डुअल- झोन FATC (पूर्ण ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल), कूल्ड ग्लव्ह बॉक्स आणि एडजस्टेबल थाई सपोर्ट दिले आहे. सियाराही ६ रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये बंगाल रूज, कूर्ग क्लाउड्स, मुन्नार मिस्ट, प्रिस्टीन व्हाइट, प्योर ग्रे आणि अंडमान अॅडव्हेंचर.
advertisement
Tata Sierra 2025 लाँच झाली आहे, पण मार्केटमध्ये आता थेट टक्कर ही हुंदाई क्रेटा, मारुती सुझुकी Grand Vitara, होंडा Elevate, Skoda Kushak आणि Volkswagen Tigun शी असणार आहे. टाटाने सियाराची सुरुवाती किंमत ११ लाख ४९ हजार एक्स शोरूम मुंबई इतकी ठेवली आहे. या गाडीची बुकिंग १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.


