श्रेयस तळपदे गुरूवारी रात्री वेलकम 3चं शुटींग करून आल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याचं त्यानं बायको दीप्तीला सांगितलं. दीप्तीनं त्याला तात्काळा अंधेरीच्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याची पत्नी दीप्ती त्याच्याबरोबर होती. दरम्यान श्रेयसवर आता अँन्जिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रकृतीची माहिती दीप्तीनं दिली आहे.
हेही वाचा - Shreyash Talpade: 'वेलकम 3' शूटिंग नंतर नेमकं काय घडलं? समोर आली श्रेयस तळपदेची हेल्थ अपडेट
advertisement
दीप्ती तळपदे हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं श्रेयसची हेल्थ अपडेट दिली आहे. तिनं लिहिलंय, 'माझ्या पतीनं नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी त्याच्यासाठी काळजी व्यक्त केली. तो लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. त्या सगळ्यांची मी आभारी आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात मेडिकल टीमनं वेळेवर आणि तातडीनं उपचार केले त्यासाठी त्यांचीही मी आभारी आहे. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्ट खासगी ठेवू इच्छितो त्याचा तुम्ही आदर करावा अशी विनंती मी करते. तुमचा पाठिंहा हा आम्हा दोघांना नवी तादक देण्याचा एक स्रोत आहे'.
चाहत्यांनी देखील श्रेयसबद्दल चिंता व्यक्ती केली. सोशल मीडिया अनेकांनी भावना व्यक्त केल्या. चाहत्यांनी श्रेयस लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. श्रेयस तळपदे सध्या अभिनेता अक्षय कुमारबरोबर वेलकम 3चं शुटींग करत आहे. गुरूवारी तो मुंबईत शुटींग करत होता. संपूर्ण दिवस तो व्यवस्थित होता. सेटवरही तो आनंदी होता. शुटींग दरम्यान त्यानं एक छोटा अँक्शन सीन देखील केला. शुटींग संपवून घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही काळानं छातीत दुखू लागलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं. तात्काळ त्याची अँन्जिओप्लास्टी देखील करण्यात आली. दरम्यान श्रेयसच्या बायकोनं दिलेल्या हेल्थ अपडेटनंतर त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.