Shreyash Talpade: 'वेलकम 3' शूटिंग नंतर नेमकं काय घडलं? समोर आली श्रेयस तळपदेची हेल्थ अपडेट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रसिद्ध अभिनेता श्रेयश तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई, 15 डिसेंबर : प्रसिद्ध अभिनेता श्रेयश तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. ही बातमी समोर येताच त्याच्या मित्र-परिवारामध्ये आणि चाहत्यांमध्ये चितेंचं वातावरण पहायला मिळालं. 47 वर्षीय श्रेयस 'वेलकम 3' चित्रपटाचं शूटिंग करून घरी परतलाच होता की त्याला त्रास होऊ लागला. सध्या श्रेयश डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
श्रेयश आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शूटिंग संपल्यानंतर नेमकं काय घडलं? याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस तळपदेनं दिवसभर वेलकम 3चं शूटिंग केलं, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सर्वांशी मजा-मस्ती करत होता. त्यानं थोडेसे अॅक्शन असलेले सीन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्यानं पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्याची पत्नीनं त्याला लगेच रुग्णालयात नेलं मात्र जाताना वाटेतट तो कोसळला.
advertisement
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी झाली. श्रेयशची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
श्रेयश तळपदे येत्या काही दिवसांत वेलकम 3 म्हणजेच वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार आहे. तो सध्या या चित्रपटाच्याच शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्रेयस 'वेलकम 3' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर यांच्यासोबत दिसणार आहे.
advertisement
दरम्यान, अभिनेता श्रेयश तळपदेनं मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यानं अनेक मालिकांमध्येही काम केलंय. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. आता लवकरच श्रेयस वेलकम 3 म्हणजेच वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2023 8:15 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shreyash Talpade: 'वेलकम 3' शूटिंग नंतर नेमकं काय घडलं? समोर आली श्रेयस तळपदेची हेल्थ अपडेट