Staycation Ideas : 'या' 5 भन्नाट आयडियांनी 'स्टेकेशन पार्टी' होईल अविस्मरणीय! सुट्टीचा मिळेल खरा आनंद

Last Updated:

Planning A Staycation Ideas And Tips : मजेदार ॲक्टिव्हिटीज, उत्तम जेवण आणि आरामदायक वातावरणामुळे तुम्ही प्रत्येकासाठी स्टेकेशन एक अविस्मरणीय अनुभव तयार करू शकता. तुम्ही पूल पार्टी, बॅकयार्ड बारबेक्यू किंवा एखादी थीम असलेली पार्टी निवडू शकता.

स्टेकेशनसाठी कल्पना आणि टिप्स..
स्टेकेशनसाठी कल्पना आणि टिप्स..
मुंबई : स्टेकेशनचे नियोजन करणे म्हणजे घराबाहेर न जाता सुट्ट्यांचा आनंद घेणे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. काही लोक एखाद्या ठिकाणी जाऊन रूममध्ये किंवा एकाच ठिकाणी राहतात, वेळ चांगला वेळ घालवतात. त्यालाही स्टिकेशन म्हणतात. घरी असो की बाहेर, याच स्टेकेशनला अविस्मरणीय अनुभाव बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
मजेदार ॲक्टिव्हिटीज, उत्तम जेवण आणि आरामदायक वातावरणामुळे तुम्ही प्रत्येकासाठी स्टेकेशन एक अविस्मरणीय अनुभव तयार करू शकता. तुम्ही पूल पार्टी, बॅकयार्ड बारबेक्यू किंवा एखादी थीम असलेली पार्टी निवडू शकता. 'स्टेकेशन पार्टी' तुम्हाला रोजच्या जीवनातील तणावापासून ब्रेक देते आणि जवळच्या लोकांच्या सोबतीचा आनंद घेण्यासाठी संधी देते. थोड्या कल्पनाशक्ती आणि नियोजनाने, तुम्ही अशी परिपूर्ण पार्टी आयोजित करू शकता, ज्याची तुमचे पाहुणे अनेक वर्षे आठवण ठेवतील.
advertisement
'स्टेकेशन पार्टी' साठी काही भन्नाट आयडिया..
एका थीमची निवड करा : एका थीमची निवड केल्याने तुमच्या पार्टीत खूप मजा येऊ शकते. तुमच्या पाहुण्यांच्या आवडीनिवडीचा विचार करा आणि त्यानुसार थीमची योजना बनवा. जसे, 'बीच बॅश' थीम उन्हाळी पार्टीसाठी एक उत्तम निवड असू शकते. तुम्ही कलर स्कीमची निवड करू शकता. तुमच्या सजावटीला, जेवणाला आणि पेयांना त्यानुसार जुळवून घेऊ शकता.
advertisement
पार्टी प्लेलिस्ट तयार करा : संगीत तुमच्या पार्टीसाठी एक उत्तम वातावरण तयार करू शकते. एक अशी प्लेलिस्ट तयार करा, ज्यात जोशपूर्ण गाणी असतील, ज्यावर सगळे नाचू शकतील. तसेच जेव्हा पार्टी शांत होईल, तेव्हा ऐकण्यासाठी तुम्ही कमी लयीची तालाची काही गाणी देखील जोडू शकता.
मजेदार ॲक्टिव्हिटीजची योजना करा : मजेदार ॲक्टिव्हिटीजशिवाय कोणतीही उन्हाळी पार्टी पूर्ण होत नाही. तुम्ही मैदानी खेळांची योजना करू शकता. जसे की कॉर्नहोल, फ्रिस्बी आणि व्हॉलीबॉल किंवा आणखी मजा घेण्यासाठी फोटो बूथ तयार करू शकता. जर तुमच्याकडे पूल असेल तर तुम्ही पाण्यातील खेळांचे आयोजन करू शकता. जसे की वॉटर व्हॉलीबॉल किंवा पूल रेसेस.
advertisement
उन्हाळ्यासाठी खास पदार्थ आणि पेये तयार करा : तुमच्या मेनूमध्ये उन्हाळ्यासाठी खास खाद्यपदार्थ आणि पेयांचा समावेश करा. तुम्ही लिंबूपाणी, आईस टी किंवा मार्गारीटा सारखी रिफ्रेशिंग पेये देऊ शकता आणि स्नॅक्ससाठी ताजी फळे, ग्रील्ड भाज्या आणि बीबीक्यू चिकन स्कीवर्स तयार करू शकता. डेझर्टसाठी आईस्क्रीम किंवा पॉप्सिकल्स देण्याचा विचार करू शकता.
एक आरामदायक वातावरण तयार करा : एक आरामदायक वातावरण तयार करून तुमच्या गेस्ट्सना सहज आणि स्वागतार्ह वाटेल याची खात्री करा. आरामदायक खुर्च्या आणि उशांसोबत बसण्याची व्यवस्था करा. लाईटची माळ आणि मेणबत्त्या देखील वातावरण अधिक सुंदर आणि वैयक्तिक बनवू शकतात. जर तुमची पार्टी घराबाहेर असेल, तर तुमच्या पाहुण्यांसाठी डास पळवणारे स्प्रे आणि सनस्क्रीन ठेवायला विसरू नका.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Staycation Ideas : 'या' 5 भन्नाट आयडियांनी 'स्टेकेशन पार्टी' होईल अविस्मरणीय! सुट्टीचा मिळेल खरा आनंद
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement