माजी उपसरपंचानंतर बीडमध्ये विस्तार अधिकाऱ्याने संपवलं जीवन, मॉर्निंग वॉकवरून आले, बेडरुममध्ये गेले अन्... 2 तासांनी आढळला मृतदेह

Last Updated:

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका ५२ वर्षीय सरकारी अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

News18
News18
परळी: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका ५२ वर्षीय सरकारी अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विलास डोंगरे असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी त्यांनी परळी येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
विलास डोंगरे हे परळी शहरातील शिवाजीनगर भागात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. दररोजच्या सवयीनुसार, गुरुवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. सकाळी साधारण ९ वाजताच्या सुमारास ते परत घरी आले. त्यानंतर ते आपल्या बेडरुममध्ये गेले. नेहमीप्रमाणेच ते लवकर बाहेर येतील अशी अपेक्षा कुटुंबियांना होती. मात्र, बराच वेळ होऊनही ते खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबियांना काहीतरी शंका आली.
advertisement
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, त्यांच्या कुटुंबियांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता, विलास डोंगरे यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावले. त्यांना खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. विलास डोंगरे यांनी नेमक्या कोणत्या कारणाने टोकाचे पाऊल उचलले, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांची सुसाईड नोट देखील सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस सध्या त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवत आहेत. आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
माजी उपसरपंचानंतर बीडमध्ये विस्तार अधिकाऱ्याने संपवलं जीवन, मॉर्निंग वॉकवरून आले, बेडरुममध्ये गेले अन्... 2 तासांनी आढळला मृतदेह
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement