अभिनेत्री करिश्मा धावत्या लोकलमधून पडली, डोक्याला दुखापत; रुग्णालयात दाखल, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Actress Local Train Accident : अभिनेत्रीनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? ती रेल्वेमधून कधी पडली?
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा रेल्वे अपघात झाला असून ती जखमी झाली आहे. अभिनेत्री धावत्या रेल्वेमधून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? ती रेल्वेमधून कधी पडली?
करिश्मा शर्मा असं अभिनेत्री आहे. रागिणी एमएमएस रिटर्न्समधून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. करिश्मा शर्मा ट्रेनमध्ये चढत असताना हा अपघात झाला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. करिश्माने सांगितले की ती चर्चगेट स्टेशनहून शूटिंगसाठी जात होती. शूटसाठी तिने साडी नेसली होती. ट्रेनमध्ये चढताच ट्रेनचा वेग अचानक वाढला. दरम्यान तिच्या मैत्रिणी ट्रेन पकडू शकणार नाहीत असे दिसल्याने घाबरून करिश्माने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. पण दुर्दैवाने ती प्लॅटफॉर्मवर पाठीवर पडली. या अपघातात तिच्या डोक्याला व पाठीला दुखापत झाली.
advertisement
हॉस्पिटलमध्ये दाखल, शरीराला जखमा
घटनेनंतर करिश्माला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, तिच्या पाठीला दुखापत झाली आहे. डोक्याला सुज आली आहे आणि शरिरावर काही जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी तिचे MRI केले असून सुदैवाने डोक्याला गंभीर दुखापत नाही असे स्पष्ट झाले आहे. सध्या तिला डॉक्टरांनी अंडर ऑब्झरवेशनमध्ये ठेवलं आहे.
advertisement

चाहत्यांना भावनिक आवाहन
करिश्माने सांगितले की तिला कालपासून खूप वेदना होत आहेत, पण ती खंबीरपणे सामना करत आहे. तिने तिच्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ती लवकर बरी होईल. करिश्माचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हॉस्पिटल बेडवर झोपलेली आहे. तिच्या हाताला सलाइन लावलेली असून करिश्मा प्रचंड थकलेली दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अभिनेत्री करिश्मा धावत्या लोकलमधून पडली, डोक्याला दुखापत; रुग्णालयात दाखल, PHOTO