बातचीत विथ युवा या युट्यूब चॅनेलशी बोलताना श्रियाने सांगितलं, "सहावी सातवीत असताना मला पहिल्यांदा पीरियड्स आले. मी तेव्हा खूप एक्साइट होते. कारण पीरियड्स काय असतात हे मला माहिती होतं. मला त्याबद्दल पूर्णपणे एज्युकेट करण्यात आलं होतं."
advertisement
श्रिया म्हणाली, "मला क्लासरूममध्ये असताना पीरियड्स आले आणि त्याचा डाग माझ्या कपड्यांना लागला. माझ्या मागे एक मुलगा बसला होता तो खूप घाबरला होता. त्याने माझ्यासाठी एक लेटर लिहिलं. त्यात लिहिलं होतं की, 'तुझ्या स्कर्टला काही तरी लागलं आहे.' त्यादिवशी स्पोर्ट्स डे होता. व्हाइट स्कर्ट, त्यामुळे तो कदाचित घाबरला असेल."
"त्याने ते लेटर माझ्याकडे दिलं. मी ते वाचलं आणि मी माझ्या टीचरकडे गेले आणि सांगितलं की मॅम मला वॉशरूमला जायचं आहे. त्यांनी माझ्या वडिलांना कॉल केला. मी माझ्या वडिलांना सांगितलं की, 'पप्पा माझे पीरियड्स सुरू झालेत'. ते मला म्हणाले, 'बेटा तू ठीक आहेस ना."
आजही मुलींना पीरियड्स आले असतील आणि सॅनिटरी पॅड हवा असेल तर हळू आवाजात एकमेकींना विचारतात. तुम्ही हे मोठ्यानेही विचारू शकता, असंही मत श्रियाने व्यक्त केलं.