मुंबईच्या रस्त्यावर हाय-व्होल्टेज ड्रामा
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की, मुंबई ट्रॅफिक पोलीस नेहमीप्रमाणे नाकाबंदी आणि गाड्यांच्या तपासणीचं काम करत होते. अशातच त्यांनी मिस्टर फैसूची गाडी थांबवली. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्याने त्याची कॉलर धरली असून ते त्याला दंड भरण्यास सांगत आहेत. फैसू मात्र अतिशय काकुळतीला येऊन विनवणी करत आहे.
advertisement
फैसू पोलिसांना उद्देशून म्हणतोय, "सर, प्लीज असं करू नका ना... दोन दिवसांपूर्वीच मी दंड भरला आहे, तुम्ही हवं तर चेक करा." त्यावर पोलीस अधिकारी मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून, 'दंड भरावाच लागेल' असं म्हणताना ऐकू येत आहेत. फैसूने नेमका कोणता नियम मोडला होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण तो पुन्हा पुन्हा "दोन दिवसांपूर्वीच भरलाय" असं का म्हणतोय, याबाबत नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.
लवकरच दिसणार सर्वात मोठ्या शोमध्ये
एकीकडे हा ट्रॅफिक पोलिसांचा राडा सुरू असतानाच, दुसरीकडे फैसू एका मोठ्या शोमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या 'The 50' या हाय-प्रोफाईल रिॲलिटी शोमध्ये मिस्टर फैसू स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या शोमध्ये करण पटेल, अर्चना गौतम आणि दिव्या अग्रवाल यांसारखे मोठे चेहरेही दिसणार आहेत. मात्र, शो सुरू होण्यापूर्वीच फैसू अशा कायदेशीर कचाट्यात सापडल्याने त्याचे चाहते थोडे चिंतेत आहेत.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दोन गट पाडले आहेत. काहींनी फैसूच्या नम्र स्वभावाचं कौतुक केलं आहे. "इतका मोठा स्टार असूनही त्याने पोलिसांशी हुज्जत घातली नाही किंवा आपल्या प्रसिद्धीचा रुबाब दाखवला नाही, तो शांतपणे विनंती करतोय," असं त्याच्या फॅन्सचं म्हणणं आहे. दुसऱ्या गटाने मात्र फैसूला सुनावले आहे. "नियम सर्वांसाठी समान असतात. जर चूक केली असेल, तर स्टार असो वा सामान्य माणूस, दंड तर भरावाच लागणार," अशा प्रतिक्रिया येत आहेत.
