भक्ती सोनी यांनी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “गुरुचरण सिंगवर सुमारे 1.2 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या वडिलांकडे ५५ कोटींची मालमत्ता आहे. दुर्दैवाने, भाडेकरू मालमत्ता रिकामी करत नाहीत. यावरून वाद सुरू आहे. जर प्रकरण मिटले आणि मालमत्ता विकली गेली तर तो त्याचे कर्ज फेडण्यास सक्षम असेल.”
गाल आत गेले, वजनही घटलं, 52 वर्षीय करण जोहरची झालीय वाईट अवस्था, VIRAL VIDEO ने वाढवली चिंता
advertisement
भक्ती सोनी यांनी दावा केला, “गुरुचरणने त्याची सर्व बचत संपवली आहे. जेव्हा त्याला सर्वात जास्त आधारची गरज असते तेव्हा त्याच्या कुटुंबीयांसह कोणीही त्याला मदत करत नाही. माझ्यासारखे मित्र आणि दिल्लीतील मित्रच त्याला आर्थिक पाठबळ देत आहेत.”
जुलै २०२४ मध्ये गुरुचरण सिंह आर्थिक संकटाचा सामना करण्याबाबत बोलला होता. काही दिवसांपूर्वी तो अचानक गायब झाला. त्यानंतर बॉम्बे टाईम्सशी बोलताना त्याने सांगितले की २०२० मध्ये कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी त्याने मुंबई सोडली होती आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक कारणांमुळे ते काम झाले नाही. त्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.