मयांक पवारच्या निधनाची माहिती त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान. मयंक पवार नेहमीच आपल्या हृदयात राहील." मयांकच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या चाहत्यांना मोठा शॉक बसला असून अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
advertisement
( YouTubeच्या कमाईतून घेतलं आलिशान होम अन् बनला ऋतिक रोशनचा शेजारी, महालासारखं घर पाहून फराह खान थक्क )
हार्ट अटॅकमुळे मयांक पवारचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी बुधवार सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत राणा प्रताप बाग येथील संगम पार्क येथील वाल्मिकी मंदिरात प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे.
स्प्लिट्सव्हिला 7 मध्ये भाग घेतल्यानंतर मयंक प्रसिद्धी मिळाली होती. शोमध्ये असताना तो खूप शांत आणि प्रामाणिक होता. यासाठी त्याचं अनेकदा कौतुक देखील करण्यात आलं होतं. मयांक जेव्हा शोमधून आऊट झाला होता तेव्हा होस्ट सनी लिओनी इमोशनल झाली होती. तिने त्याला घट्ट मिठी मारली होती.
रिअॅलिटी टेलिव्हिजनच्या पलीकडे, मयंकने फिटनेस उद्योगात एक त्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. तो सात वेळा मिस्टर इंडिया विजेता आणि एकदा मिस्टर इंडिया चॅम्पियन होता. त्याने सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम केलं होतं. बॉडीबिल्डिंगमधील त्याच्या कामामुळे अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळत होती.
मयांक या जगात नाही यावर अनेकांना विश्वास बसत नाहीये. "बाहेरून मसल्स दिसणं म्हणजे तुम्ही निरोगी आहात असे नाही... स्टिरॉइड्सचे जास्त सेवन केल्याने हळूहळू अंतर्गत अवयव नष्ट होतात." असंही अनेकांनी म्हटलं आहे. पण मयांकचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही.
