दोन वर्ष हॉलेटल्या एका खोलीत राहिलेल्या श्रीदेवी
शेफ हरपाल यांनी सांगितले की, श्रीदेवींची हॉटेलमध्ये एक ठरलेली खोली होती. या खोलीत त्या एक-दोन दिवस नव्हे तर दोन वर्ष राहिल्या. पण या हॉटेलमध्ये त्यांनी कधीही फार क्वचितच जेवण केलं. श्रीदेवी यांच्यासाठी त्यांचा स्पॉट बॉय 'हरीश' नामक एका रेस्टॉरंटमधून जेवण आणायचा. मंगलोरियन पद्धतीचं हे जेवण असायचं. या रेस्टॉरंटमधील साधी डाळ आणि भात श्रीदेवींच्या विशेष आवडीचं होतं. ग्लॅमरच्या झगमगाटामागे असलेली त्यांचा हा साधेपणा सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकायचा.
advertisement
Marathi Movie : मराठी चित्रपट प्रेमींसाठी Good News! जुन्या फिल्म नव्याने पाहा, त्याही Freeमध्ये, पण कुठे?
बॉलिवूडकरांचा अड्डा 'सेंटॉर' हॉटेल
हरपाल सिंह पुढे म्हणाला की, त्या काळात संपूर्ण बॉलिवूड या हॉटेलमध्येच पाहायला मिळायचं. इथे फिल्मी पार्ट्या व्हायच्या, कलाकारांचे अवॉर्ड शो आणि अगदी मोठमोठे लग्न समारंभही याठिकाणी होत असत. धर्मेंद्र यांच्या मुलाचं लग्नही याच ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं होतं".
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा शेअर करत हरपाल म्हणाले,"अमिताभ बच्चन ज्यावेळी आपल्या कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये येत असत तेव्हा प्रत्येकाच्या जेवणाकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं. जर अभिषेकच्या ताटात थोडं तरी अन्न उरलं असेल, तर ते लगेच त्याला रागावत म्हणत, "पाणात वाढलेलं सगळं खा, अन्न वाया घालवू नये."
चाहत्यांना आजही येतेय श्रीदेवीची आठवण
सेंटॉर हॉटेल आणि तो काळ आता फक्त आठवणींतच उरला आहे. पण श्रीदेवी यांचा हा साधेपणा आणि शिस्त आजही चाहत्यांना त्यांच्या खास व्यक्तिमत्वाची आठवण करून देतो. चित्रपटांमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये दिसणारी ही सुपरस्टार खऱ्या आयुष्यात अतिशय साधी पाय जमिनीवर असणारी व्यक्ती होती.