पुणेरी वडापाव खाऊन दिली भन्नाट रिॲक्शन
सध्या 'तेरे इश्क में' या म्युझिकल रोमँटिक ड्रामा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता धनुष, अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि दिग्दर्शक आनंद एल. राय नुकतेच पुणे शहरात दाखल झाले होते. पुणेरी चाहत्यांना भेटल्यानंतर या तिघांनी येथील प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्याचा बेत केला. प्रमोशनच्या गडबडीतून वेळ काढत, धनुष आणि आनंद एल. राय यांनी गाडीत बसूनच वडापावची चव घेतली.
advertisement
क्रिती सेनॉनने या दोघांना विचारले, "चांगला आहे का?" यावर क्षणाचाही विलंब न लावता धनुष म्हणाला, "उत्कृष्ट, अविश्वसनीय आहे!" दिग्दर्शक आनंद एल. राय यांनीही त्याला दुजोरा देत वडापावचे कौतुक केले.
क्रितीने शेअर केला खास व्हिडिओ
क्रिती सेनॉनने वडापाव खातानाचा हा मजेदार व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "पुण्यात आलात तर खा आणि जेवणाच्या प्रेमात पडा!" 'तेरे इश्क में' ची संपूर्ण टीम पुणेरी पदार्थांच्या प्रेमात पडली आहे असं दिसतंय. भारतीय सिनेसृष्टीतील इतका मोठा सुपरस्टार पुण्याच्या रस्त्यांवर येऊन वडापावचा आनंद घेतोय, हे पाहून त्यांच्या मराठी चाहत्यांना खूप आनंद झाला.
चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाल
तेरे इश्क में हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. धनुषने यात 'शंकर' आणि क्रिती सॅननने 'मुक्ती' हे पात्र साकारले आहे. विशेषतः, धनुषच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
