२०२०-२१ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना राणौतने एका ७३ वर्षीय महिलेबद्दल आक्षेपार्ह रिट्विट केलं होतं. तिने म्हटलं होतं की, 'शाहीन बागच्या आंदोलनात सामील झालेली 'तीच' आजी इथेही दिसतेय.' यानंतर महिंदर कौर नावाच्या या महिलेने कंगनावर मानहानीचा खटला दाखल केला. कंगनाने हा खटला रद्द करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात याचिका केली होती, पण ती रद्द झाली.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाने कंगना राणौतला सुनावलं
त्यानंतर कंगनाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली, पण कोर्टानेही तिच्यावर जोरदार ताशेरे ओढले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने कंगनाच्या याचिकेवर नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती मेहता यांनी कंगनाच्या वकिलाला म्हटलं की, “हे फक्त एक साधं रिट्विट नाही. तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये मसाला टाकला आहे.”
कंगनाच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की, यावर कंगनाने स्पष्टीकरण दिलं आहे. यावर कोर्टाने म्हटलं की, “हे स्पष्टीकरण तुम्ही ट्रायल कोर्टात द्या.” वकिलांनी पंजाबमध्ये प्रवास करणं कठीण असल्याचं सांगितलं, पण कोर्टाने तिला वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट मागण्याची परवानगी दिली.
जेव्हा वकिलांनी पुढे वाद घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोर्टाने त्यांना थेट बजावलं, “आम्हाला तुमच्या ट्विटवर कमेंट करायला लावू नका. तुमचं स्टेटमेंट तुमची बाजू खराब करू शकतं.” यानंतर कंगनाने तिची याचिका मागे घेतली आहे.