नवरीला उचलून चढल्या जेजुरीच्या पायऱ्या
लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्याने देवदर्शनासाठी थेट जेजुरीच्या खंडेरायाच्या दरबारात हजेरी लावली. हा क्षण सूरजसाठी खूप खास होता. प्रथेनुसार, सूरजने आपल्या पत्नीला उचलून घेऊन जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्या. 'यळकोट यळकोट जय मल्हार' च्या जयघोषात त्यांनी मंदिरात सर्व धार्मिक विधी पूर्ण केले.
advertisement
या दर्शनाचे फोटो शेअर करताना त्याने लिहिले, "मल्हारी माझा जगाचा राजा, आलोय जोडीने दर्शनाला." तर व्हिडिओ शेअर करताना तो अधिकच भावूक झाला. त्याने लिहिले, "काय सांगू खंडेराया या दिवसांसाठी मी किती वाट पाहिली, अशीच राहू दे तुझ्या कृपेची अविरत सावली."
लव्ह मॅरेज यशस्वी झाले!
केवळ देवदर्शनाचेच नाही, तर रिसेप्शन लूकमधील संजनासोबतचे काही रोमँटिक फोटोही त्याने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या खास रिसेप्शनसाठी संजनाने लाल रंगाचा लेहेंगा तर सूरजने पांढऱ्या रंगाचा जोधपुरी ड्रेस परिधान केला होता. हे फोटो शेअर करताना सूरजने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्याने कॅप्शन दिले, "जी होती मनात तीच बायको केली, आमचे लव्ह मॅरेज यशस्वी झाले." सूरजच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
बिग बॉस नंतर जीवन बदलले
'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर सूरज चव्हाणचे आयुष्य पूर्णपणे बदलले. या विजयानंतर त्याने 'झापूक झुपूक' हा चित्रपट केला. तसेच, त्याने नुकताच नव्या घरात प्रवेश केला होता. याच नवीन घरात त्याच्या लग्नाचे विधीही थाटामाटात पार पडले.
