पण फार कमी लोकांना माहित आहे की, एक यशस्वी अभिनेता असण्यासोबतच सुशांत अभ्यासातही खूप हुशार होता. तो खूप टॅलेंटेडही होता. त्याच्याकडे अनेक कलागुण होते.
2025 Hit Movie: फक्त 8 दिवसात सिनेमाने केला राडा, बॉक्स ऑफिसवर कमावला मोठा गल्ला, 2025 चा हिट सिनेमा
सुशांत सिंग राजपूतने 2003 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग प्रवेश परीक्षेत देशात सातवा क्रमांक मिळवला होता. यानंतर सुशांत सिंगने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, परंतु अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात त्याने अभ्यास सोडून अभिनयाला सुरुवात केली. ते भौतिकशास्त्रात राष्ट्रीय ऑलिम्पियाड विजेतेही होते. त्याने आयएसएम धनबादसह सुमारे 11 अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या.
advertisement
बारावी पास झाल्यावर आई वारली थिएटर आणि डान्स क्लासेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्याला अभ्यासासाठी फारसा वेळ मिळत नव्हता, म्हणून त्याने डीटीयू सोडली. त्यानंतर त्याने थिएटर ग्रुप जॉईन केला. सुरुवातीला खर्च भागवण्यासाठी त्याने छोट्या नोकऱ्याही केल्या.
दरम्यान, 2008 मध्ये एकता कपूरने त्याला ''किस देश मै मेरा दिल'' या शोमध्ये त्याला कास्ट केलं. त्यानंतर त्याने ''पवित्र रिश्ता'' मालिका केली. मग सिनेमाकडे वळाला. ''काई पो छे''मधून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. मग अनेक सिनेमात काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
14 जून 2020 मध्ये त्याने आत्महत्या करुन स्वतःचं जीवन संपवलं. त्याचं मृत्यूचं गूढ आजही एक गूढच आहे. याप्रकरणी अनेक चौकशी झाली, तपास केला मात्र याचं सत्य अखेर समोर आलं नाही. त्यामुळे त्याची मिस्ट्री डेथ अनेकांना विचलित करणारी होतं. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक चांगला कलाकार गमावला. आजही लोक त्याची आठवण काढतात.
