2025 Hit Movie: फक्त 8 दिवसात सिनेमाने केला राडा, बॉक्स ऑफिसवर कमावला मोठा गल्ला, 2025 चा हिट सिनेमा

Last Updated:
2025 Hit Movie: साऊथचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिवर खळबळ उडवत आहेत. अशातच आणखी एक सिनेमा प्रेक्षकांचं लक्ष वेधून बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन करताना दिसत आहे.
1/7
साऊथचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिवर खळबळ उडवत आहेत. अशातच आणखी एक सिनेमा प्रेक्षकांचं लक्ष वेधून बॉक्स ऑफिसवर जोरदार कलेक्शन करताना दिसत आहे.

advertisement
2/7
जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'डाकू महाराज' या तेलगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. नंदामुरी बालकृष्णाचा हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. अवघ्या 4 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

3/7
'डाकू महाराज' देशातच नाही तर परदेशातही गल्ला करत आहेत. नंदामुरी बालकृष्णाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते. दररोज हा चित्रपट करोडो रुपयांचा व्यवसाय करत आहे.

4/7
नंदामुरी बालकृष्ण यांचा 'डाकू महाराज' हा चित्रपट 12 जानेवारीला पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. याने अवघ्या 8 दिवसांत 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

5/7
 केवळ 4 दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि त्याचे संपूर्ण बजेट वसूल केले होते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर 'डाकू महाराज' हा ॲक्शनपट 100 कोटी रुपये बजेटमध्ये बनवण्यात आलाय.

6/7
भारतात 'डाकू महाराज'ने आतापर्यंत एकूण 78.35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.35 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ व्हर्जनमध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

7/7
नंदामुरी बालकृष्णने या चित्रपटात एका डाकूची भूमिका साकारली आहे. बॉबी देओल आणि उर्वशी रौतेला यांच्याशिवाय प्रज्ञा जैस्वाल, श्रद्धा श्रीनाथ आणि चंद्रिनी चौधरी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याची कथा बॉबी कोळी यांनी लिहिली असून दिग्दर्शनही केलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement