CSK च्या ऋतुराजचं डिमोशन, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला लॉटरी, इंडियाच्या कर्णधारपदी नवा चेहरा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सीनियर खेळाडूंसोबतच ज्युनिअर खेळाडूही भारतामध्ये आहेत.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सीनियर खेळाडूंसोबतच ज्युनिअर खेळाडूही भारतामध्ये आहेत. इंडिया ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यात दोन अनऑफिशियल टेस्ट आणि 3 अनऑफिशियल वनडे मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये इंडिया ए चा विजय झाला आहे. तर दुसरी अनऑफिशियल टेस्ट 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यानंतर 13 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरूवात होईल.
दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंडिया ए ची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्माकडे इंडिया ए चे नेतृत्व देण्यात आलं आहे, तर ऋतुराज गायकवाड टीमचा उपकर्णधार आहे. तर हर्षित राणाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजऐवजी इंडिया ए कडून खेळायला पाठवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर लगेचच अभिषेक शर्माही दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध वनडे सीरिज खेळेल.
advertisement
इंडिया ए टीमचे सदस्य
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन, आयुष बदोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंग
इंडिया ए-दक्षिण आफ्रिका ए सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 13 नोव्हेंबर, राजकोट
दुसरी वनडे - 16 नोव्हेंबर, राजकोट
advertisement
तिसरी वनडे- 19 नोव्हेंबर, राजकोट
भारताच्या टेस्ट टीमचीही घोषणा
याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाची दक्षिण आफ्रिका ए सीरिजसाठी निवड झाल्यामुळे दोघांचीही टेस्ट सीरिजसाठी निवडण्यात आलेलं नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दोन टेस्ट 14 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये सामने खेळवले जातील.
advertisement
टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीम
शुबमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, वॉश्गिंटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK च्या ऋतुराजचं डिमोशन, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला लॉटरी, इंडियाच्या कर्णधारपदी नवा चेहरा!


