TRENDING:

‘हे कसलं दाखवलं?’ कारमधल्या दृश्यावरुन बोंबाबोंब, Toxicच्या टीझरवरून तमाशा; महिला आयोगाकडे तक्रार

Last Updated:

Toxic Teaser: दाक्षिणात्य सुपरस्टार यश यांच्या आगामी ‘Toxic: A Fairy Tale For Grown-Ups’ या चित्रपटाच्या टीझरमुळे वाद पेटला असून, आप महिला आघाडीने थेट कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: दाक्षिणात्य सुपरस्टार यश यांच्या आगामी चित्रपटToxic: A Fairy Tale For Grown-Ups’ च्या टीझरमुळे वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पार्टीच्या (AAP) महिला आघाडीने या टीझरविरोधात कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आपच्या राज्य सचिव उषा मोहन यांनी दाखल केलेल्या तक्रारीत टीझरमधील काही दृश्ये आक्षेपार्ह असून, त्याचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा आरोप करण्यात आला आहे.

advertisement

आपच्या नेत्यांनी सांगितले की, ही तक्रारसामाजिक नैतिकतेचे रक्षण करण्यासाठी आणि समाजातील संवेदनशील घटकांचे संरक्षण करण्यासाठी” दाखल करण्यात आली आहे.तक्रारदारांनी आयोगाकडे टीझर तात्काळ मागे घेण्याची तसेच तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे.

advertisement

वाचा: काही सेकंदांचा खेळ, बया झाली फेमस; तो सीन पाहून सगळे बावचळले, यशसोबतची ती गोरी कोण? सगळेच शोधायला लागले

या प्रकरणाची दखल घेत कर्नाटक राज्य महिला आयोगाने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला (CBFC) नियमांनुसार तपास करण्यास सांगितले असून, करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

advertisement

कारमधील दृश्यामुळे टीझर चर्चेत

यशच्या 40 व्या वाढदिवशी या महिन्याच्या सुरुवातीला ‘Toxicचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरमधील कारमध्ये यश आणि एका महिलेतील जवळीक दाखवणारे दृश्य विशेषतः चर्चेत आले. हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यावरूनच वादाला तोंड फुटले.

advertisement

दरम्यान CBFC सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित टीझर फक्त YouTube वर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे तो सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. CBFC अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फक्त चित्रपट आणि थिएटरमध्ये दाखवण्यासाठी तयार केलेले ट्रेलर्स यांनाच प्रमाणपत्र आवश्यक असते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या प्रमोशनल कंटेंटवर CBFC चे नियंत्रण लागू होत नाही.

Toxicसंदर्भात CBFC कडून कोणतेही प्रमाणपत्र नाही

सेन्सॉर बोर्ड सूत्रांनी पुढे सांगितले की, Toxicचित्रपट किंवा त्यासंदर्भातील कोणत्याही कंटेंटसाठी आतापर्यंत CBFC कडे प्रमाणपत्रासाठी अर्जच सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑनलाइन प्रसिद्ध झालेल्या टीझरचा CBFC च्या मंजुरी किंवा सेन्सॉर प्रक्रियेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक सणाला गोड जोड, पुण्यात मिळतंय चक्क तिळगुळ चॉकलेट, हे आहे लोकेशन
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
‘हे कसलं दाखवलं?’ कारमधल्या दृश्यावरुन बोंबाबोंब, Toxicच्या टीझरवरून तमाशा; महिला आयोगाकडे तक्रार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल