TRENDING:

नवे शब्द, नव्या चाली… 'द फोक आख्यान' टीमनं रंगवला सिनेमाचा आत्मा! 'क्रांतिज्योती'चं संगीत ठरणार नव्या वर्षाचं सरप्राइज

Last Updated:

हेमंत ढोमेच्या 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमाचं संगीत नव्या वर्षाचं खास सरप्राइज ठरणार आहे. 'द फोक आख्यान'च्या हर्ष-विजय आणि ईश्वर अंधारे यांची वर्णी सिनेमाल लागली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'द फोक आख्यान' या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. महाराष्ट्र गाजवून ही मंडळी आता विदेश गाजवायला गेली आहेत. 2026 वर्ष हे या कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही खास ठरणार आहे. द फोक आख्यानचे संगीतकारभारी हर्ष -विजय आणि ईश्वर अंधारे यांचा फुलवरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाची काही दिवसांआधीच घोषणा करण्यात आली. दरम्यान फुलवाराच्या आधी फोक आख्यानचे त्रीमूर्ती हेमंत ढोमेच्या 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा फेक आख्यानच्या त्रीमूर्तींचा पहिला वहिला सिनेमा ठरला आहे.  अभिनेता हेमंत ढोमेनं खास पोस्ट लिहित ही माहिती दिली.
News18
News18
advertisement

2026 वर्ष मराठी सिनेमांसाठी खास ठरणार आहे. कारण वर्षांच्या पहिल्याच दिवशी एक दमदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा आगामी सिनेमा 1 जानेवारी 2026 रोजी रिलीज झाला.  मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमांचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे सिनेमाचं संगीत फोक आख्यानचे हर्ष विजय आणि ईश्वर अंधारे करणार आहेत.  अभिनेता हेमंत ढोमेनं खास पोस्ट लिहित ही माहिती दिली.

advertisement

( Exclusive : रवी जाधवांचा 'फुलवरा' ठरला स्वप्नपूर्तीचा क्षण! 'द फोक आख्यान'च्या कलाकारांचा आनंद गगनात मावेना; पहिली प्रतिक्रिया )

अभिनेता हेमंत ढोमेनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय,  "क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचं लिखाण संपलं आणि टीमची बांधणी सुरू झाली. यावेळी या सिनेमासाठी एकदम नवं आणि आपल्या मातीतलं संगीत असावं असं वाटत होतं.  आणि मग एक दिवस ‘द फोक आख्यान’ या महाराष्ट्र गाजवणाऱ्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि तो सबंध कार्यक्रम स्तब्ध करून गेला. ईश्वर, हर्ष आणि विजय आणि संपूर्ण टीमने स्टेजवर जे काही केलं ते केवळ अफलातून होतं, अविस्मरणीय होतं! तो खऱ्या अर्थाने लोककलेचा, मराठी भाषेचा सोहळा होता.  नवे शब्द, नव्या चाली… नवा प्रयोग! त्या दिवशीच ठरवलं… आपल्या क्रांतिज्योती चे संगीत कारभारी हेच."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

हेमंतनं पुढे लिहिलंय, "आता या चित्रपटातील पाच अस्सल आणि रांगडी गाणी तयार आहेत. ही गाणी बनवताना आम्हाला प्रचंड मजा आलीय. मला खात्री आहे तुम्हाला तर खूप जास्त मजा येणार आहे. या चित्रपटाचं संगीत लवकरात लवकर तुमच्या भेटीला घेऊन येण्याची मलाच घाई आहे. मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेलं हे 'फोल्क' रूपी नवं टॅलेंट आता क्रांतिज्योती विद्यालय पासून तुमचं झालं… मला खात्री आहे, ही मंडळी तुम्हाला निराश करणार नाहीत.  आपल्या मातीतली 5 खणखणीत गाणी जी आपल्याला पुन्हा मराठी शाळेत घेऊन जाणार. लवकरच! चला हर्ष-विजय आणि ईश्वर चं आपल्या शाळेत मनापासून स्वागत करूया… खूप प्रेम आणि खूप खूप अभिमान भावांनो!"

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
नवे शब्द, नव्या चाली… 'द फोक आख्यान' टीमनं रंगवला सिनेमाचा आत्मा! 'क्रांतिज्योती'चं संगीत ठरणार नव्या वर्षाचं सरप्राइज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल