एक महिनाभर सुरु होता उपचार
अदा शर्माच्या आजी अल्सेरेटिव्ह्ह कोलायटिस आणि डायव्हर्टिक्युलायटिस यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अदा आणि तिच्या आजीचे नाते खूप खास होते. अदा अनेकदा आजीसोबतचे सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर करत असे. 'पार्टी विथ पाती' नावाचे त्यांचे व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते.
advertisement
जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अदा तिच्या आजीच्या सर्वात जवळ होती आणि ती त्यांच्यासोबतच राहत होती. तथापि, अदाने अद्याप आपल्या आजीच्या निधनावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
इंटरनेट ट्रोलिंगवरही द्यायची भन्नाट उत्तर
अदा शर्मा आणि तिच्या आजीमध्ये किती खास नाते होते, याबद्दलचे अनेक किस्से आहेत. २०२१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अदाने सांगितले होते की, तिची आजी सोशल मीडियावर तिचे पोस्ट आणि त्यावर आलेल्या कमेंट्स नियमितपणे वाचायची. एवढेच नाही, तर इंटरनेटवर होणाऱ्या ट्रोलिंगला तोंड देण्यासाठीही आजी मागे हटायची नाही. काही महिन्यांपूर्वी अदाने तिच्या आजीच्या वाढदिवसाचा व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये त्या दोघींमधील जिव्हाळा स्पष्ट दिसत होता.
'द केरळ स्टोरी'मुळे अदा शर्माला मिळाली मोठी ओळख
अदा शर्मा आणि तिची आई आजीच्या होमटाऊन केरळमध्ये त्यांच्यासाठी स्मृतिसभा आयोजित करणार आहेत. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अदा शर्माने २००८ मध्ये '१९२०' या हॉरर ड्रामा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. '१९२०' मध्ये तिने केलेल्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते आणि तिला 'बेस्ट फिमेल डेब्यू' साठी फिल्मफेअर अवॉर्डचे नामांकनही मिळाले होते. अलीकडेच ती 'तुमको मेरी कसम' या चित्रपटामध्ये अनुपम खेर, ईशा देओल यांच्यासोबत दिसली होती, पण बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही.
