टू मच टॉकच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने जान्हवी कपूरला झालेल्या फसवणूकीकडे दुर्लक्ष करण्याचा आणि लग्न टिकवण्याचा सल्ला दिला. त्यांचा हा सल्ला ऐकून सगळेच शॉक झालेत.
( कोणाच्या सांगण्यावरून जान्हवी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी? )
ट्विंकल खन्नाने सांगितले की, फिजिकल चिटिंग तिच्यावर फारसा परिणाम करत नाही, पण इमोशनल चिटिंग अधिक त्रासदायक असतं. शोच्या 'दिस ऑर दॅट' सेगमेंटमध्ये काजोल आणि ट्विंकल खन्नाने करण जोहर आणि जान्हवी कपूरला विचारला की, 'इमोशनल चिटिंग ही फिजिकल चिटिंगपेक्षाही वाईट असते'. इमोशनल चिटिंग असं म्हणत ट्विंकल, काजोल आणि करण एक साइडला गेले.
advertisement
जान्हवी कपूर एकमेव होती जी म्हणाली की, "फिजिकल चिटिंग हे डिल ब्रेक करणारा आहे. तिच्या जोडीदाराने असं केलं तर ते तिच्यासाठी तो डिल ब्रेकअर आहे." यावर ट्विंकल खन्ना पुढे म्हणाली, "आपण 50 च्या दशकात आहोत आणि ती फक्त 20 च्या दशकात आहे. ती लवकरच या सर्कलमध्ये एन्ट्री करेल. आपण जे पाहिले ते तिने पाहिलेले नाही. रात गई बात गई."
शोच्या 'दिस ऑर दॅट' सेगमेंटमध्ये काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी विचारले की, "लग्नात प्रेम की कॉम्पेटिबिलिटी जास्त महत्त्वाची आहे?" ट्विंकल आणि जान्हवी म्हणाल्या की, "लग्नात प्रेम खूप महत्वाचे आहे." तर करण आणि काजोल असं म्हणाले की, "कॉम्पेटिबिलिटी आवश्यक आहे. लग्नानंतर प्रेम सर्वात आधी संपते. त्यामुळे कॉम्पेटिबिलिटी तर नाते टिकत नाही."
