गडद लाल आणि काळ्या रंगाच्या छटांमध्ये तयार झालेले हे पोस्टर पाहताच क्षणी एक वेगळी अस्वस्थता जाणवते. सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या तीन प्रमुख कलाकारांचे चेहरे या पोस्टरवर दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवरील शांतता, नजरेतील अस्वस्थता आणि ओठांवरील हलके स्मितहास्य एक अज्ञात रहस्य सांगत आहे. या पोस्टरमध्ये प्रेम एका रहस्यमय रूपात दिसत आहे, तर संशयाची तीक्ष्ण धारही स्पष्ट जाणवते. तिघांमधील सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
advertisement
प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! तब्बल दीड वर्ष बोलत नव्हते बाप-लेक, असं झालं तरी काय होतं?
दिग्दर्शक आणि निर्माते सचित पाटील यांनी चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले, "'असंभव' हा फक्त एक सस्पेन्स थ्रिलर नसून, तो मानवी भावनांच्या सर्वात खोल थरांना स्पर्श करणारा आहे. प्रेम, भीती, संघर्ष आणि रहस्य यांच्या सीमारेषा या चित्रपटात एकत्र आल्या आहेत."
सचित पाटील यांनी पुढे सांगितले की, उत्तराखंडमधील नैनितालच्या मोहक आणि रहस्यमय वातावरणात चित्रीत झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे त्याचे प्रत्येक दृश्य तांत्रिकदृष्ट्या अप्रतिम आणि सिनेमॅटिक अनुभव देणारे आहे.
पुष्कर श्रोत्री सहदिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट यांच्यासह संदीप कुलकर्णी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 'मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट' आणि 'एरिकॉन टेलिफिल्म्स'च्या सहनिर्मितीतून साकारला आहे.