प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! तब्बल दीड वर्ष बोलत नव्हते बाप-लेक, असं झालं तरी काय होतं?

Last Updated:
अभिनेत्याच्या करियरच्या सुरुवातीला एका गोष्टीवरून त्याचे वडील इतके नाराज झाले होते की, त्यांच्यातील नाते तुटता तुटता वाचले. त्याने स्वतःच एका मुलाखतीत हा हृदयद्रावक किस्सा सांगितला होता.
1/8
मुंबई: बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील आणि प्रसिद्ध चित्रकार सत्यजीत सिंग शेरगिल यांचे ११ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या स्मरणार्थ भोग आणि अंतिम प्रार्थना ठेवण्यात आली आहे.

advertisement
2/8
वडिलांसोबत जिमीचे नाते खूप भावनिक होते, परंतु त्याच्या करियरच्या सुरुवातीला एका गोष्टीवरून त्याचे वडील इतके नाराज झाले होते की, त्यांच्यातील नाते तुटता तुटता वाचले. खुद्द जिमी शेरगिलने एका मुलाखतीत हा हृदयद्रावक किस्सा सांगितला होता.

3/8
सत्यजीत सिंग शेरगिल यांचे पुत्र जिमी शेरगिल याचा जन्म एका शीख कुटुंबात झाला. त्याने १८ वर्षांचा होईपर्यंत डोक्यावर पगडी बांधली होती. तोपर्यंत त्याचे केस वाढलेले होते आणि दाढीही होती.

4/8
पण जेव्हा जिमी हॉस्टेलमध्ये शिकत होता, तेव्हा त्याला वारंवार पगडी धुण्याचा आणि केसांची काळजी घेण्याचा त्रास जाणवू लागला. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्याने कोणालाही न सांगता केस आणि दाढी कापून टाकली आणि पगडी घालणे सोडून दिले!

5/8
जिमी जेव्हा नवीन लूकमध्ये घरी परतला, तेव्हा त्याचा अवतार पाहून वडील सत्यजीत सिंग भयंकर संतापले. संपूर्ण कुटुंब त्याच्यावर खूप रागवले. वडिलांना हा बदल इतका अपमानकारक वाटला की, त्यांनी जिमी शेरगिलशी तब्बल दीड वर्षांपर्यंत बोलणे पूर्णपणे सोडले!

6/8
बाप-लेकाचे नाते तुटण्याच्या अगदी जवळ आले होते. विशेष म्हणजे, त्या वेळी जिमी शेरगिलचा अभिनेता बनण्याचा किंवा चित्रपटात काम करण्याचा कोणताही विचार नव्हता.

7/8
जिमी शेरगिलने १९९६ मध्ये 'माचिस' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, पण त्याला खरी ओळख २००० मध्ये आलेल्या 'मोहब्बतें' या चित्रपटातून मिळाली.

8/8
यानंतर त्याने 'हासिल', 'दिल है तुम्हारा' आणि 'साहेब बीवी और गँगस्टर' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांत काम केले. नुकताच तो पंजाबी चित्रपट 'मां जाए' मध्ये दिसला होता. आगामी काळात ते 'दे दे प्यार दे २', 'बुलेट विजय' आणि 'मिस्टर आय' या चित्रपटांमध्ये तो झळकणार आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement