Mumbai Metro 2B: पूर्व उपनगर- पश्चिम उपनगराला जोडणारी मेट्रो लाईन 2B केव्हापासून सुरू होणार? मुंबईकरांच्या वेळेत होणार बचत
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Mumbai Metro 2B Phase 1: मुंबई आणि उपनगरामध्ये मेट्रोचे जाळे झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहरांना उपनगराशी जोडण्यासाठी मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रो लाइन 2A म्हणजे यलो लाइन मुंबईतील पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. या लाइनीचा पहिला टप्पा सुरू आहे, लवकरच आता दुसरा टप्पा म्हणजेच 2B रेड लाइन सुरू होणार आहे.
advertisement
advertisement
मेट्रो लाइन 2B चा दुसरा टप्पा 2026 पासून सुरू होणार आहे. सध्या या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. तर पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या चाचण्या लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 5.3 किमी लांबीचा मानखुर्द ते डायमंड गार्डनर चेंबूरपर्यंत असणार आहे. हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सेवेत येणार आहे.
advertisement
MMRDA लवकरच डीएन नगर ते सारस्वत नगर असा दुसरा टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सारस्वत नगर आणि डायमंड गार्डनमधील फक्त मध्यवर्ती भागच शिल्लक राहील. पूर्ण झाल्यानंतर 20 स्थानकांसह 23.6 किमी लांबीची लाईन 2B कॉरिडॉर शहरातील दुसरा महत्त्वाचा पूर्व- पश्चिम मेट्रो मार्ग कनेक्शन सुरू होणार आहे. सध्या, फक्त मेट्रो 1 (वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर) पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडते.
advertisement
डी. एन. नगर, एसिक नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खीरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलेज, बांद्रा मेट्रो, इनकमटॅक्स ऑफिस, आय एल एफ एस, एम टी एन एल मेट्रो, एस जि बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व), इ. इ. एच., चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बी एस एन एल मेट्रो, मानखुर्द, मंडाळे मेट्रो असे 20 स्थानकं मेट्रो लाइन 2Bच्या स्थानकांमध्ये असणार आहेत. हे एकूण 20 स्थानके 23.6 किमीच्या परिसरामध्ये विस्तारले आहे.
advertisement
मेट्रो लाइन 2B हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, मोनोरेल, मेट्रो मार्ग -2अ (दहिसर ते डी एन नगर), मेट्रो मार्ग-3 (कुलाबा ते सिप्झ) आणि मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या महत्वाच्या मार्गांना जोडतो. प्रामुख्याने हा मार्ग पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांना जोडणारा आहे. हा मार्ग मुंबईतील व्यावसायिक, सरकारी संस्था आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील रेल्वेला सुविधा प्रदान होईल.