Narak Chaturdashi 2025: यमराजाचा कोप! नरक चतुर्दशीला केलेल्या या चुका दिवाळीच्या आनंदावर विरजन घालतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीच्या दिवशी दिपावलीचा सण साजरा केला जातो. नावाप्रमाणेच (नरक) या दिवशी मृत्यूचा देव यम याच्या पूजेसाठी समर्पित सण आहे. त्याची पूजा केल्यास कुटुंबात अकाली मृत्यूचे भय दूर करतो आणि घरात आनंद, समृद्धी आणि संरक्षण आणतो. या दिवशी, संध्याकाळच्या प्रदोष काळात घराच्या एका कोपऱ्यात चारमुखी असलेला दिवा लावावा आणि पूजा केल्यानंतर, तो दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते. नरक चतुर्दशीला यमासाठी दिवा लावल्यानं कुटुंबातील मृत्यूचे भय दूर होते. हा सण घरात आनंद, समृद्धी आणि संरक्षण आणतो, असं मानलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या दिवशी पूजा करताना हनुमान चालीसा पठण करणे आवश्यक आहे. यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील सर्वांनी या पूजेमध्ये सहभागी व्हावे. दक्षिण दिशेला घराबाहेर दिवा लावल्यानंतर, त्याच्या जवळ जाऊ नये.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)