Bihar Elections : मैथिली ठाकूरची राजकारणात ग्रँड एन्ट्री! भाजपाचा झेंडा घेतला हाती, कुठून निवडणूक लढवणार?
Last Updated:
Bihar Assembly Elections : २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मैथिली ठाकूरने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी तिला पक्षाचे सदस्यत्व दिले.
1/10
बिहार: आपल्या मधुर आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना भुरळ पाडणाऱ्या आणि बिहारच्या लोकसंस्कृतीला गाण्याच्या माध्यमातून नवी ओळख देणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरने आता राजकारणात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
advertisement
2/10
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मैथिली ठाकूरने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी तिला पक्षाचे सदस्यत्व दिले.
3/10
मूळच्या बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील असलेल्या मैथिली ठाकूरचा जन्म २५ जुलै २००० रोजी झाला आहे. अवघ्या २५ वर्षांच्या या गायिकेने राजकारणात प्रवेश केल्यामुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले आहे.
4/10
मैथिली ठाकूर केवळ भाजपमध्ये दाखल झाली नाही, तर ती विधानसभेची निवडणूक लढवणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. ती अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
5/10
यापूर्वीच भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्या भेटीमुळे ती निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
6/10
मैथिली ठाकूरने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटणा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक लढवण्याबद्दल विचारले असता ती म्हणाली,
advertisement
7/10
तिने बिहारमधील एनडीए सरकारच्या काळात झालेले सुधार पाहिले असल्याचे सांगितले. निवडणुकीत कोण जिंकेल, हे जनता ठरवेल, असेही ती म्हणाली.
8/10
मैथिली ठाकूरने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच आपल्या आजोबांकडून संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिचे वडील रमेश ठाकूर (जे तिचे गुरुही आहेत) आणि आई भारती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने दहा वर्षांच्या होईपर्यंत भजन जागरण आणि स्थानिक संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर करण्यास सुरुवात केली होती.
9/10
आज मैथिली आणि तिचे भाऊ ऋषभ ठाकूर व अयाची ठाकूर यांच्यासह देशभरात भक्तिगीते आणि बिहारची लोकसंस्कृती पोहोचवत आहेत. तिची लोकप्रियता बिहारमध्ये खूप मोठी आहे.
10/10
मैथिलीने राजकारणाच्या मैदानात उतरल्याने महिला मतदारांना ती मोठ्या प्रमाणात आकर्षित करू शकते, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
View All
advertisement