WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियासोबत 'गेम', वेस्ट इंडिजला धुतल्यानंतरही रँकिंगमध्ये झटका!

Last Updated:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने 121 रनचं आव्हान 35.2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं.

WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियासोबत 'गेम', वेस्ट इंडिजला धुतल्यानंतरही रँकिंगमध्ये झटका!
WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियासोबत 'गेम', वेस्ट इंडिजला धुतल्यानंतरही रँकिंगमध्ये झटका!
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने 121 रनचं आव्हान 35.2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पार केलं. केएल राहुलच्या 58 रन आणि साई सुदर्शनच्या 39 रनच्या जोरावर भारताने हा सामना 7 विकेटने जिंकला. याचसोबत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज 2-0 ने जिंकली आहे. याआधी अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा इनिंग आणि 140 रननी विजय झाला होता. यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला भारताचा हा लागोपाठ तिसरा विजय होता.
याआधी इंग्लंड दौऱ्यामध्ये झालेली 5 टेस्ट मॅचची सीरिज भारताने 2-2 ने ड्रॉ केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधल्या या सत्रात टीम इंडियाचे 52 पॉईंट्स आणि 61.90 टक्के इतकी विजयी टक्केवारी झाली आहे. या सत्रात भारताने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला असून एक मॅच ड्रॉ झाली आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला असला तरी भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, पण टीम इंडियाची विजयी टक्केवारी 55.56 वरून 61.90 टक्के एवढी झाली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या यंदाच्या मोसमात वेस्ट इंडिजचा सर्व 5 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.
advertisement

टीम इंडियाला धक्का लागणार

वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज 2-0 ने जिंकली असली तरी भारतीय टीमला मोठा धक्का बसणार आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लाहोरमध्ये सुरू असलेल्या टेस्टमध्ये कोणत्याही टीमचा विजय झाला तरी भारतीय टीम चौथ्या क्रमांकावर जाईल, कारण या सामन्यातल्या विजयी टीमची विजयी टक्केवारी 100 टक्के होईल. तर दुसरीकडे हा सामना ड्रॉ झाला तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी 33.33 टक्के होईल.
advertisement

ऑस्ट्रेलिया नंबर वन

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान सामन्याचा निकाल काहीही लागला तरी, ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. ऑस्ट्रेलियाने 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी 100 टक्के आहे. ऑस्ट्रेलिया त्यांची पुढची टेस्ट 21 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध पर्थमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या ऍशेस सीरिजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियासोबत 'गेम', वेस्ट इंडिजला धुतल्यानंतरही रँकिंगमध्ये झटका!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement