Diwali 2025: दिव्यांग मुलांची आत्मनिर्भर दिवाळी, फराळ आणि क्राफ्ट बनवून उजळवतायत सणाचा प्रकाश
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील सेवासदन दिलासा कार्यशाळेतील दिव्यांग मुले, जी स्वतःच्या मेहनतीने आणि कल्पकतेने दिवाळी फराळ आणि आकर्षक क्राफ्ट वस्तू तयार करत आहेत. या उपक्रमातून ही मुले आत्मनिर्भर होत असून, समाजालाही प्रेरणा देत आहेत.
पुणे: दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण. पुण्यातील सेवासदन दिलासा कार्यशाळेतील दिव्यांग मुले, जी स्वतःच्या मेहनतीने आणि कल्पकतेने दिवाळी फराळ आणि आकर्षक क्राफ्ट वस्तू तयार करत आहेत. या उपक्रमातून ही मुले आत्मनिर्भर होत असून, समाजालाही प्रेरणा देत आहेत.
एरंडवणे भागातील सेवा सदन दिलासा कार्यशाळा ही संस्था गेली चार दशकांपासून प्रौढ दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 45 वयोगटातील पुरुष आणि महिला दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याने, त्यांना हातांनी काहीतरी शिकवून स्वावलंबी बनवणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेत चकली, चिवडा, शंकरपाळे, बेसन लाडू अशा पारंपरिक दिवाळी फराळ पदार्थ करण्यात येत आहे. गेली 25 वर्षे हे उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत.
advertisement
विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ स्वच्छता आणि गुणवत्तेची पूर्ण काळजी घेत तयार केले जातात. या फराळाचे 100 ते 150 किलोपर्यंत उत्पादन दरवर्षी केले जाते, ज्याची विक्री संस्थेबाहेरच ही मुले स्वतः करतात. फराळासोबतच येथे दिवाळीला शोभा आणणाऱ्या विविध हॅण्डीक्राफ्ट वस्तूंची निर्मिती केली जाते. यात आकाशकंदील, पूजा थाळी, तोरण, हँगिंग डेकोरेशन, कंदील आणि इतर सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारा निधी पुन्हा या मुलांच्या प्रशिक्षण आणि विकासासाठी वापरला जातो. 50 रुपयांपासून या वस्तूंची किंमत सुरू होते आणि त्यांच्या सुंदर डिझाईनमुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.
advertisement
या कार्यशाळेत प्रशिक्षक हे दिव्यांग मुलांसोबत काम करत त्यांना मार्गदर्शन करतात. या मुलांमध्ये असलेले कौशल्य आणि प्रामाणिकपणा पाहिला की अभिमान वाटतो. असे सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या व्यवस्थापिका मेघना जोशी यांनी सांगितले. नारियल कॉस्मेटिक कंपनी सारख्या उद्योगांनी या विशेष दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून त्याची विक्री आपल्या माध्यमातून सुरू केली आहे. यामुळे या मुलांना आर्थिक बळ मिळत असून, त्यांच्या आत्मविश्वासात भर पडत आहे. मेघना जोशी पुढे म्हणाल्या, आमचं ध्येय केवळ वस्तू बनवणं नाही, तर या मुलांना समाजात आपलं स्थान निर्माण करून देणं आहे. अशा या दिव्यांग मुलांच्या कष्टातून आणि कलात्मकतेतून निर्माण होणारा फराळ आणि क्राफ्ट या दिवाळीत सेवा सदन दिलासा कार्यशाळेतील दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून आपणही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटं योगदान देऊ शकतो.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 7:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Diwali 2025: दिव्यांग मुलांची आत्मनिर्भर दिवाळी, फराळ आणि क्राफ्ट बनवून उजळवतायत सणाचा प्रकाश