'छावा' सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र हा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा विक्कीला चांगलीच धडकी भरली होती. त्याला एवढी भीती वाटत होती की त्याने त्याचा मोबाईल देवासमोर मंदिरात ठेवला होता.
'छावा' सिनेमासाठी विक्की कौशलने किती पैसे घेतले? अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?
विक्की कौशलने मोबाईल मंदिरात का ठेवला?
advertisement
विक्की कौशलने ABP न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'छावा'चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्याने कोणाला दाखवला आणि त्याची रिअॅक्शन काय होती? याविषयी खुलासा केला. विक्कीने सांगितलं, "जेव्हा ट्रेलर रिलीज झाला त्याच्या आदल्या रात्री 1 वाजताच्या दरम्यान ट्रेलर मला पाठवण्यात आला होता. मी एवढा घाबरलो होतो की, ट्रेलर कसा आहे, काय आहे? कारण एवढी मेहनत केली होती. पहिल्यांदा मी गेलो आणि मोबाईल देवासमोर मंदिरात ठेवला आणि मग मी प्ले केला. मी म्हणाले देवा सांभाळून घे..खूप मेहनत केलीय. मला काय माहिती नाही कसा आहे ट्रेलर प्लीज तेवढं बघून घ्या. मी संपूर्ण ट्रेलर मोबाईल मंदिरात ठेवूनच पाहिला."
विक्की पुढे म्हणाला, "त्यानंतर मी ट्रेलर आईला दाखवला. तर ती पाहून रडली. मग मी पप्पा, कतरिना, सनीला दाखवला. त्यांनाही आवडला. आणि प्रेक्षकांनाही ट्रेलर आवडला आणि त्यांनीही खूप प्रेम दिलं."
