छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षाची कहाणी 'छावा'मधून दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा पाहून प्रेक्षक भारावरून गेले. विकीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये लोक 'छावा'च्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करत आहेत.
छावासाठी कोट्यवधी मानधन, पण विकी कौशलचा पहिला पगार किती होता माहितीय?
विकीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही लोक 'छावा'च्या पोस्टरवर चढून दुग्धाभिषेक करत आहेत. मुलगा मोठमोठ्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणा देत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच विकीने त्याच्या इंस्टाग्रामवरही हा व्हिडिओ शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिलं, 'छत्रपति संभाजी महाराज की जय!'.
advertisement
या व्हिडिओवर अनेक कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पहायला मिळत आहे. अनेकांनी म्हटलं, "अंगावर काटा आला. अभिमान आहे अहमी या जन्म भूमी मध्ये जन्मलो", "जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता. स्वराज्याचं धाकले धनी शंभुराजे", "विकी भाऊ बघितले ना मराठ्यांचं प्रेम", "अक्षरशः रडलो सर खूपच छान", "तन धन जीवन समर्पित माझ्या राजांसाठी", अशा अनेक कमेंट पोस्टवर पहायला मिळत आहेत.
दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरचा 'छावा' सिनेमा सध्या खूपच चर्चेत असून लोकांच्या पसंतीस उतरत आहे. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, 'छवा'ने भारतात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 36.5 कोटी कमावले आहेत. त्यामुळे सिनेमा तुफान वेगाने बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहेत.