छावा सिनेमातील पहिलं गाणं
विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक समोर आलीय. 'छावा'तील समोर आलेल्या पहिल्या गाण्याचं नाव आहे, 'जाने तू'. हे गाणं अरिजीत सिंगने गायलं असून ए.आर. रहमानने संगीत दिलं आहे. गाण्याची पहिली झलक समोर आली असून उद्या हे गाणं रिलीज होणार आहे.
advertisement
पहिलाच सिनेमा ठरला शेवटचा, अचानक झाली गायब, आता 15 वर्षांनी पुन्हा कमबॅक करणार ही अभिनेत्री!
दरम्यान, संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. स्वराज्यासाठी त्यांनी मुघलांपासून संरक्षण करताना दिलेला लढा अतिशय प्रेरणादायी आहे. 'छावा' या चित्रपटात त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी स्वराज्यासाठी काय काय केलं दाखवण्यात येणार आहे.
शिवाजी सावंत यांच्या “छावा” या कादंबरीवरून प्रेरित होऊन हा सिनेमा तयार करण्यात येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
