विजय देवरकोंडा 'रावडी जनार्दन' या त्याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेश त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचं शूटींग सध्या रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे या निसर्गरम्य गावात सुरू आहे.
गेल्या एका आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीत 'रावडी जनार्दन' सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. गावातील द मॉडेल इंग्लीश स्कुलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाचं कथानक 1900 सालातील असल्याने त्या काळचा ब्रिटिशकालीन सेट गावात उभारण्यात आला आहे.
advertisement
समुद्रकिनाऱ्यावर सुरू शूटिंग
'रावडी जनार्दन' सिनेमाचं शूटींग सैतवडे गावातील समुद्रकिनाऱ्यावरही सुरू आहे. सिनेमातील काही महत्त्वाचे सीन्स या ठिकाणी शूट करण्यात आलेत. सैतवडेतील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पुढील शेड्युल शेजारच्या बरवडे गावात होणार असल्याचं सांगितलं जातंय.
शूटींग पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी
या चित्रीकरणामुळे सैतवडे आणि परिसरातील गावांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक लोक दररोज सेटवर उपस्थित राहून शूटिंग पाहत आहेत. विजय देवरकोंडा आणि कीर्ती सुरेशला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे.
अभिनेता विजय देवरकोंडा काही दिवसांआधी त्याच्या आणि रश्मिका मंदानाच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आला होता. रश्मिका आणि विजय अनेक वर्ष रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. दोघांनी हैद्राबादमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विजयला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं तेव्हा त्याच्या हातात साखरपुड्याची अंगठी दिसली होती. त्यानंतर काही तासात विजयचा कार अपघातही झाला होता.
