विक्रांत मेस्सीने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. 2004 मध्ये 'कहां हूं मैं' या टीव्ही शोमधून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर तो 'धर्मवीर', 'बालिका वधू', 'बाबा ऐसा वर ढूंढो', आणि 'कुबूल है' यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकला.
टॉयलेट रूमच्या बाहेर मिळाला पहिला ब्रेक
विक्रांतने आपल्या पहिल्या ब्रेकबद्दल सांगताना म्हटले की, त्याला 2004 मध्ये प्रथम अभिनयाची संधी मिळाली होती. त्यावेळी तो एका टॉयलेट रूमच्या बाहेर उभा होता, तेव्हा एक महिला त्याच्याकडे आली आणि विचारले की, तो अभिनय करेल का? या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडला 6,000 रुपये मिळाले. यानंतर विक्रांतने कधीच मागे वळून पाहिले नाही.
advertisement
आश्रमच्या 'बबिता भाभी'ने लग्नाआधीच दिली Good News? बेबीबंपच्या व्हिडीओने उडवली खळबळ
टीव्हीच्या जगात आपली ओळख निर्माण केल्यानंतर विक्रांतने 'दिल धड़कने दो' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. त्यानंतर तो कोकणा सेन शर्माच्या 'अ डेथ इन द गंज', 'गिन्नी वेड्स सनी', दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' आणि '12वीं फेल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसला. '12वीं फेल'साठी विक्रांतला फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळाला.
विक्रांतने अनेक वेब सीरिजमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, ज्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली. 2018 मध्ये 'मिर्झापूर', 2019 मध्ये 'क्रिमिनल जस्टिस', 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'ब्रोकन बट ब्युटीफुल' या शोमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय केला.
