लेकीच्या जन्माचा वडिलांना आनंद
व्हायरल व्हिडीओमध्ये, एक महिला डान्स करत नवजात बाळाला रुग्णालयातील वॉर्डमधून बाहेर आणते. तिच्या चेहऱ्यावर लक्ष्मीच्या आगमणाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. तसेच आसपासदेखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महिला जशी रूममधून बाहेर येते तसं डाव्या बाजूने मुलीचे वडील 'धुरंधर' चित्रपटाच्या 'FA9LA' गाण्यावर अक्षय खन्नाच्या स्टेप्स करत लेकीचं स्वागत करताना दिसतात. डान्स करत करत तो व्यक्ती जेव्हा आपल्या मुलीला कुशीत घेतो, तेव्हा भावनांना आवर घालत स्वतःला सावरतो. 19 सेकंदाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नेटकरी त्या वडील आणि मुलीवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
advertisement
यामी गौतमची खास कमेंट
धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी यामी गौतमने हा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. यामी गौतमने लिहिलं आहे," Hands down, winner” म्हणजेच "निःसंशय, हाच खरा विजेता. विनर ऑफ द ट्रेंड". आतापर्यंत हा व्हिडीओ 6.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, 17 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सही आहेत.
नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
नेटकरी कमेंट करत वडिलांचे अभिनंदन करत आहेत. आज सकाळी मी पाहिलेली हीच सर्वात सुंदर पोस्ट आहे. त्यांची डान्स करतानाची स्माइल अप्रतिम आहे, हे म्युझिक आता टॉपवर आहे, देव बाळाला आशीर्वाद देवो, हे खरंच ट्रेंडचे विनर आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
