विराटच्या विधानावर चाहते नाराज
विराट कोहलीने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, "माझ्या वाईट काळात फक्त माझी पत्नी अनुष्का शर्माच माझ्यासोबत उभी होती." या विधानावर त्याचे काही चाहते नाराज झाल्याची गमतीदार प्रतिक्रिया देत आहेत. विराटच्या या स्टेटमेंटवर त्याच्या चाहत्यांनी एक भन्नाट व्हिडिओ तयार केला आहे. या रीलमध्ये चाहत्यांनी इम्रान खानचे 'बेवफा' हे गाणे बॅकग्राऊंडला लावले आहे.
advertisement
रीलमध्ये एक चाहता निराश होऊन ढसाढसा रडत असल्याचे नाटक करत आहे आणि खिडकीतून उडी मारण्याचा अभिनय करत आहे. तर दुसरा डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी कांदा कापताना रडण्याचा अभिनय करताना दिसत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये चाहत्यांनी लिहिले आहे, "जेव्हा विराटने म्हटले की त्याच्या वाईट काळात फक्त अनुष्का शर्मानेच त्याची साथ दिली." चाहत्यांनी या रीलच्या माध्यमातून विराटला बेवफा म्हणत, 'आम्हीही तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबतच होतो,' असे गंमतीशीरपणे दाखवले आहे.
अनुष्कानेही लाइक केलं रील
ही रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असताना, ती थेट अनुष्का शर्मापर्यंत पोहोचली आणि अनुष्काही स्वतःला ती रील लाईक करण्यापासून रोखू शकली नाही. अनुष्काचा लाईक दिसताच कॉमेंट बॉक्समध्ये धुमाकूळ उडाला. एका युजरने कमेंट केली, "भाभी जी ने पूरा कंट्रोल रखा है!" दुसऱ्याने लिहिले, "काय यार अकायचे पप्पा!" अनेक युजर्सनी "अनुष्का शर्माने पण लाईक केले आहे!" अशा कमेंट्स करत आपला आनंद व्यक्त केला.
