सुबोधने सांगितलं की, “प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं. पण ती त्यातून बाहेर पडली आणि पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक आणि मालिकांमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली. पण, त्या कर्करोगाने काही तिची पाठ सोडली नाही. आमची ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका सुरू असताना, तिला पुन्हा एकदा तो त्रास सुरू झाला. या संपूर्ण प्रवासात तिचा पती शंतनू मोघे तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता.”
advertisement
शेवटच्या दिवसांमध्ये प्रियाची काळजी घेणाऱ्या शंतनूचं केलं कौतुक
यावेळी सुबोधने शंतनू मोघेचंही खूप कौतुक केलं. सुबोध म्हणाला, प्रियाच्या आजारपणात तिची काळजी घेण्यासाठी शंतनूनेही काम थांबवलं होतं. तो पूर्णवेळ तिची काळजी घेत होता. आजच्या काळात असं कोणीही करत नाही. आज जिथे लोक दोन महिन्यात वेगळे होतात, तिथे या आजारपणातही प्रियाला शंतनूचा भक्कम आधार होता.”
प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं?
सुबोधने प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं याबद्दलही सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, प्रियासाठी शंतनूने काम सोडलं होतं आणि अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने एक मालिका हातात घेतली होती. प्रिया जायच्या आदल्या रात्री शंतनूचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता. तो एपिसोड प्रियाने पाहिला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रियाने शंतनू आणि तिच्या आईसमोर प्राण सोडले. प्रियाच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगत असताना सुबोध भावेला अश्रू अनावर झाले होते.