रश्मिका मंदान्ना अलीकडे लंडनमध्ये झालेल्या ‘We The Women’ फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. या कार्यक्रमात नामवंत पत्रकार बरखा दत्त यांच्याशी संवाद साधताना तिने तिच्या करिअर, वैयक्तिक निवडी, आणि महिला कलाकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मोकळेपणाने मत व्यक्त केलं.
रेखाच्या मांडीवरची 'ही' चिमुकली आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री! ओळखलं का तिला?
रश्मिकाने स्पष्टपणे सांगितलं की ती कधीही धूम्रपान करणारी भूमिका स्वीकारणार नाही. ती म्हणाली, "मला धूम्रपान ही गोष्ट अजिबात पटत नाही. त्यामुळे मी प्रत्यक्ष आयुष्यातही आणि पडद्यावरही कधीही धूम्रपान करताना दिसणार नाही. ही माझी वैयक्तिक मर्यादा आहे. जर एखाद्या भूमिकेसाठी मला धूम्रपान करायला लावलं गेलं, तर मला चित्रपट सोडावा लागेल. मी हे करु शकत नाही."
advertisement
तिच्या अलीकडील गाजलेल्या चित्रपट 'अॅनिमल' मधील तिच्या भूमिकेवर चर्चा करताना रश्मिका म्हणाली की, "हा चित्रपट मी फक्त एक कलाकृती म्हणून पाहिला. चित्रपटातील नायक काही करत असल्यामुळे प्रेक्षक तसंच करतील, असं मला वाटत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या निर्णयाने गोष्टी करतो."
रश्मिका सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच तिने तिच्या ‘मैसा’ या नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. याशिवाय ती 'थम्मा', 'द गर्लफ्रेंड', 'रेनबो' आणि ‘पुष्पा 3’मध्ये झळकणार आहे. धनुषसोबतचा ‘कुबेर’ अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे, मात्र हिंदी चित्रपट ‘सिकंदर’ फारसा चालला नाही.
