झायरा वसीमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या लग्नाचे दोन सुंदर फोटो पोस्ट केले. पहिल्या फोटोमध्ये, ती निकाहनामा किंवा लग्नाच्या करारावर स्वाक्षरी करताना दिसत आहे. तिच्या हातावर सुंदर मेहेंदी आणि पन्नाची अंगठी दिसत आहे. झायराने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी लग्न केलं.
advertisement
झायरा वसीमने फोटो शेअर केले दुसऱ्या फोटोमध्ये, झायरा आणि तिचा पती मागून आकाशाखाली उभे राहून चंद्राकडे पाहत असल्याचे दिसत आहे. झायराने रेड दुपट्टा वेअर केला आहे. तर तिच्या नवऱ्याने क्रीम कलरची शेरवानी आणि मॅचिंग स्टोल घातला होता. तिने फोटोंमध्ये तिच्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. "कुबूल है x3" असं कॅप्शन देत झायरानं लग्नाचे फोटो शेअर केलेत.
जायरा वसीमने वयाच्या 16 व्या वर्षी आमिर खानच्या दंगल 2016 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात तिने कुस्तीगीर गीता फोगटची बालपणीची भूमिका साकारली. तिच्या दमदार अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर तिने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात काम केले.
2019मध्ये जायरा वसीमने इंडस्ट्री सोडली. दरम्यान झायराला तिच्या लग्नासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. तिवे स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवलं असलं तरी सोशल मीडियावर ती अनेकदा धर्म आणि अध्यात्माबद्दल माहिती शेअर करते.