Sai Pallavi : नॅचरल ब्युटी साई पल्लवी जेव्हा मराठमोळ्या लावणीवर थिरकली, चुकला चाहत्यांचा काळजाचा ठोका, Video तुम्ही पाहिला का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sai Pallavi Dance Video : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने 'अप्सरा आली' या मराळमोळ्या लावणीवर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. आजही सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होतो.
Sai Pallavi : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनय, सौंदर्यासह अनेकदा तिचा साधेपणाही प्रेक्षकांना भावतो. काही दिवसांपूर्वीच तिने 'अप्सरा आली' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. मराठी गाण्यांची ख्याती जगभरात आहे. बॉलिवूडकर अनेकदा मराठीतील ट्रेडिंग गाण्यांवर थिरकताना दिसतात. जगाला वेड लावणाऱ्या लावणीने साऊथ इंडस्ट्रीलाही भूरळ घातली आहे. दोन महिन्यांपूर्वी साऊथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने मराळमोळ्या लावणीवर ठेका धरला होता. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अभिनेत्रीने आपल्या कोट्यवधि चाहत्यांना काळजाचा ठोका चुकवायला लावला होता. आपल्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात साई पल्लवी 'अप्सरा आली' या गाण्यावर बहिणीसोबत लावणी करताना दिसून आली होती.
साई पल्लवीने लावणी केलेली 'अप्सरा अली' हे 'नटरंग' या बहुचर्चित चित्रपटातील सुपरहिट गाणं आहे. या गाण्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने 'अप्सरा' ही भूमिका साकारली होती. गुरू ठाकूर यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते तर अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. बेला शेंडेने हे गाणं गायलं होतं. रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 'अप्सरा आली' या गाण्यानंतर सोनाली कुलकर्णीला 'अप्सरा' म्हणून ओळख मिळाली होती. अशा या लोकप्रिय गाण्यावर साई पल्लवी थिरकल्याने चाहत्यांना वेड लागलं होतं.
advertisement
advertisement
साई पल्लवीच्या 'रामायण'ची प्रतीक्षा
साई पल्लवी 'रामायण' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात साई पल्लवी सीतामातेची भूमिका साकारणार आहे. तर रणबीर कपूर श्रीमाच्या भूमिकेत आहे. दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातं. 'रामायण'चा पहिला भाग 2006 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
साधेपणा हीच साई पल्लवीची ओळख
view commentsसाई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 मध्ये तामिळनाडूमध्ये झाला. एमबीबीएस साई पल्लवीने 2015 मध्ये 'प्रेमम' या मल्याळम चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तामिळ, तेलुगु, मल्याळम चित्रपटांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री आणि डान्स असलेल्या साई पल्लवीची खरी ओळख ही तिच्यातील साधेपणा ही आहे. तिच्या साधेपणाचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होतं. काली, मिडल क्लास अब्बाय, मारी 2, पावा कढाईगल, लव्ह स्टोरी, श्याम सिंघा रॉय, गार्गी, अमरन, थंडेल अशा अनेक चित्रपटांमध्ये साई पल्लवी झळकली आहे. सशक्त महिलांच्या भूमिकांसाठी साई पल्लवी विशेष ओळखली जाते. अभिनेत्रीला आजवर दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sai Pallavi : नॅचरल ब्युटी साई पल्लवी जेव्हा मराठमोळ्या लावणीवर थिरकली, चुकला चाहत्यांचा काळजाचा ठोका, Video तुम्ही पाहिला का?