TRENDING:

Explainer: न्यायाधीशाच्या घरात बेहिशोबी रोकड, तुम्ही घरी किती रोख पैसे ठेवू शकता? जाणून घ्या A to Z गोष्ट

Last Updated:

Explainer How much cash can you keep at home: सध्या देशात न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेल्या बेकायदेशीर रोकडचे प्रकरण चर्चेत आहे. या घटनेनंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, कोणत्याही व्यक्तीला कायदेशीररीत्या घरात किती रोकड ठेवता येते? यासंबंधी आयकर कायद्यात काही मर्यादा आहेत का? जाणून घ्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर रोकड सापडल्याचा प्रकार अलीकडेच चर्चेत आला. या घटनेनंतर न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडील कामकाज काढून घेण्यात आले होते. नंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये 14 मार्च रोजी लागलेल्या आगीनंतर त्यांच्या घरात जळालेल्या नोटांचे बंडल सापडले होते. भारताचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांनी रोकड जप्तीशी संबंधित आरोपांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ न्यायाधीशांची तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
News18
News18
advertisement

या घटनेनंतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, एखादी व्यक्ती कायदेशीररित्या घरात किती रोकड ठेवू शकते? याबद्दल देशाचा आयकर कायदा काय सांगतो?

घरात कितीही रक्कम ठेवता येते

फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोणतीही व्यक्ती घरात कितीही रक्कम ठेवू शकते, यावर कोणतेही बंधन नाही. जोपर्यंत तुम्ही हे सिद्ध करू शकता की, ही रक्कम कायदेशीर स्रोतांमधून कमावलेली आहे आणि तुम्ही ती तुमच्या आयकर रिटर्नमध्ये घोषित केली आहे. जर तुम्ही हे सिद्ध करण्यात अपयशी ठरला की, पैसा कायदेशीर नाही. तर तुम्हाला गंभीर दंड भरावा लागू शकतो. आयकर अधिकारी केवळ पैसा जप्त करणार नाहीत, तर ते तुमच्यावर 137 टक्क्यांपर्यंत दंडही ठोठावू शकतात. रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, जाणकार योग्य कागदपत्रे ठेवण्याचा सल्ला देतात – ज्यात पावत्या, पैसे काढण्याच्या स्लिप आणि व्यवहारांच्या नोंदी यांचा समावेश आहे. तसेच रोख व्यवहारांपासून दूर राहा.

advertisement

शेअर बाजारात पैसे गुंतवणे म्हणजे आत्मघात; फंड मॅनेजरने इशाऱ्याने झोप उडाली

किती रक्कम जमा करता येते?

न्यूज18 इंग्लिशच्या वृत्तानुसार, कोणतीही व्यक्ती कर्ज किंवा ठेवीच्या स्वरूपात 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ शकत नाही. स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबतही हेच लागू होते. जर तुम्ही तुमच्या खात्यात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा किंवा काढली. तर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक द्यावा लागेल. जर एखादी व्यक्ती एका वर्षात 20 लाख रुपये रोख जमा करत असेल. तर त्याला पॅन आणि आधार दोन्ही उपलब्ध करून द्यावे लागतील. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेत मालमत्तेची खरेदी-विक्री केल्यास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाऊ शकते. जर क्रेडिट कार्ड धारकाने क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे एकाच वेळी एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. तर त्या व्यक्तीची चौकशी केली जाऊ शकते.

advertisement

तज्ज्ञ काय म्हणतात?

टॅक्समनचे उपाध्यक्ष सीए नवीन वाधवा यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले- आयकर कायद्यात हे स्पष्ट केलेले नाही की, एखादी व्यक्ती घरात किती रोकड ठेवू शकते. व्यक्ती आपल्या आर्थिक नोंदींमध्ये योग्यरित्या नोंदवलेल्या कायदेशीर स्रोतांद्वारे मिळालेली योग्य प्रमाणात रोकड ठेवू शकते. हे उल्लेखनीय आहे की, आयकर कायद्यात अस्पष्टीकृत उत्पन्नाला संबोधित करण्यासाठी स्पष्ट तरतुदी आहेत. ज्या कलम 68 ते 69 बी मध्ये नमूद केल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीकडे पुरेशी रोकड असेल. तर कर अधिकारी पैशाच्या स्रोताची चौकशी सुरू करू शकतात. ज्यासाठी व्यक्तीला सविस्तर स्पष्टीकरण देणे आवश्यक असेल.

advertisement

Share Market घसरतोय पण 'या' व्यक्तीने एका महिन्यात कमावले 333 कोटी

वाधवा म्हणाले, अशा पैशांचे स्वरूप आणि स्रोताबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास, हा पैसा अघोषित उत्पन्न म्हणून करपात्र ठरू शकतो. अशा प्रकरणांमध्ये अघोषित उत्पन्नावर 78 टक्के दराने कर लावला जाऊ शकतो. तसेच दंडही भरावा लागू शकतो.

2 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम घेणे चुकीचे

advertisement

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले, जर तुम्ही एखादा व्यवसाय चालवत असाल, तर तो तयार केलेल्या रोख पुस्तकाशी जुळला पाहिजे. व्यवसाय न करणाऱ्या लोकांकडूनही अशा रोख रकमेच्या स्रोताबाबत स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.

हे कायदेशीर सिद्ध करण्यासाठी बँकेतून काढलेली रोकड किंवा तुम्हाला मिळालेल्या भेटवस्तूंमधून मिळालेल्या रोख रकमेच्या पावत्या उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्ही दावा करत असाल की, रोकड भेटवस्तू किंवा मालमत्ता व्यवहारातून मिळाली आहे. तर कृपया लक्षात घ्या की, कर कायद्यांमध्ये भेटवस्तू किंवा मालमत्ता व्यवहारांसाठी दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यास मनाई आहे. असे न केल्यास आयकर विभाग तितकाच दंड आकारू शकतो.

मराठी बातम्या/Explainer/
Explainer: न्यायाधीशाच्या घरात बेहिशोबी रोकड, तुम्ही घरी किती रोख पैसे ठेवू शकता? जाणून घ्या A to Z गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल