दादर मार्केटमध्ये यंदाही राख्यांची रेलचेल बघायला मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी राख्यांचे स्टॉल्स लागले असून ग्राहकांचा उत्साह सुद्धा लक्षणीय आहे. बहिणी आपल्या भावासाठी खास राखी निवडण्यासाठी गर्दी करत असून बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. या स्टॉल्सवर अगदी 5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या साध्या राख्यांपासून ते 200 रुपयांपर्यंतच्या आकर्षक डिझायनर राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये मुलींसाठी चमचमीत मोत्यांच्या राख्या, मोटू पटलू, डोरेमॉन, स्पायडरमॅन यांसारख्या कार्टून कॅरेक्टर असलेल्या लहान मुलांच्या राख्या, तसेच मोठ्यांसाठी खास चांदीच्या व कुंदन काम केलेल्या राख्यांचा समावेश आहे.
advertisement
Labubu Doll: लबूबू डॉलचा ट्रेंड आहे तरी काय? मुंबईत तर फक्त 350 रुपयांमध्ये करा खरेदी, Video
यावर्षी एक राखी विशेष चर्चेत आहे, ती म्हणजे लबूबू राखी. जेन झी आणि तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय असलेली ही लबूबू डॉल असलेली राखी सध्या बाजारात ट्रेंडमध्ये आहे. लबूबू राखीची किंमत सुमारे 150 रुपये आहे. अनेक स्टॉल मालकांनी सांगितलं की, लबूबू राखीला यंदा खूप मागणी आहे. अनेक मुलं-मुली याच राखीच्या शोधात येत आहेत.
व्यापाऱ्यांनी यंदा ग्राहकांच्या पसंतीचा अंदाज घेत विविध प्रकारच्या राख्यांचा साठा करून ठेवला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथून आलेल्या राख्या यावर्षी विशेष आकर्षण ठरत आहेत. काही स्टॉल्सवर हाताने बनवलेल्या राख्याही पाहायला मिळत आहेत. राखीच्या खरेदीसोबत बाजारात फुलांची, मिठाईची आणि भेटवस्तूंची दुकानंही सजली असून आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठ उत्साहाने उजळून निघालेली आहे.