चुकीचा पोश्चर
अनेक लोक चालताना खाली बघतात किंवा खांदे वाकवून चालतात. यामुळे मान, पाठ आणि कंबरेला ताण येतो. योग्य पोश्चर म्हणजे डोके सरळ ठेवा, खांदे मागे आणि पोट आतल्या बाजूला ठेवा.
वेग आणि गतीचा अभाव
अतिशय हळू चालल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढत नाहीत आणि कॅलरी कमी प्रमाणात जळतात. वजन कमी करण्यासाठी किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी वेगवान आणि उत्साही चालणे आवश्यक आहे.
advertisement
श्वास घेण्याची चुकीची पद्धत
चालताना अनेकजण लहान आणि उथळ श्वास घेतात. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. चालताना मोठा आणि खोल श्वास घ्या.
चुकीचे शूज वापरणे
योग्य आणि आरामदायक शूज न घातल्यास पायाला, गुडघ्यांना आणि पाठीला दुखापत होऊ शकते. जुने किंवा चुकीच्या डिझाइनचे शूज टाळा. चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट्स शूज वापरा.
चालण्याची योग्य पद्धत
हात हलवा
चालताना हात शरीराच्या जवळ, 90 अंशाच्या कोनात हलवा. यामुळे शरीराला गती मिळते आणि जास्त कॅलरी जळतात.
हायड्रेशन
चालण्यापूर्वी आणि चालल्यानंतर पुरेसे पाणी प्या. शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास स्नायूंमध्ये क्रॅम्प येऊ शकतात आणि थकवा जाणवू शकतो. या छोट्या-छोट्या चुका सुधारल्यास तुमच्या चालण्याचा तुमच्या आरोग्यावर अधिक सकारात्मक परिणाम होईल. केवळ स्टेप्सची संख्या नाही, तर चालण्याची गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)