अमेरिकेतील ही महिला, जिने आपल्या प्रेग्नन्सीचा विचित्र अनुभव सांगितला आहे. द सन वेबसाईटच्या मते, महिलेने सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नन्सीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला महिलेनं सांगितलं की तिनं पहिली सोनोग्राफी केली तेव्हा तिला जुळी मुलं असल्याचं सांगण्यात आलं. दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिच्या पोटात 2 नाही तर 3 बाळ आहेत.
advertisement
पण तिसरी सोनोग्राफी केली तेव्हा तिला मोठा धक्का बसला. कारण पोटात फक्त एकच बाळ दिसलं. 3 पैकी दोन बाळ गायब होते.
नवरा मूल देऊ शकत नव्हता, 15 IVF सुद्धा फेल, शेवटी AI ने महिलेला केलं प्रेग्नंट, कसं काय?
तिनं सांगितलं की, बाळाने आपल्याच भावाबहिणीला खाल्लं. शेवटी तिनं आपल्या बाळाचा फोटोही शेअर केला आहे. ज्यात तो पूर्णपणे निरोगी दिसतो आहे.
हे कसं शक्य आहे?
आता युझर्सनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की एक मूल दुसऱ्या मुलाला कसं खाईल? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल. यावर दुसऱ्या युझरने माहिती दिली आहे. त्याने सांगितलं की, असं होण्याच्या दोन शक्यता आहे. एक म्हणजे वॅनिशिंग ट्विन सिंड्रोम आणि दुसरं म्हणजे ह्यूमन काइमेरा.
Pregnancy News : प्रेग्नंट महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी तसाच ठेवला मृतदेह, पुढे जे घडलं ते...
वॅनिशिंग ट्विन सिंड्रोम अशी स्थिती आहे, ज्यात गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक भ्रूण विकसित होतात पण त्यापैकी एक किंवा अधिक भ्रूण विकसित होणं थांबतं आणि ते आईचं शरीर किंवा इतर भ्रूणांमार्फत आकर्षून घेतलं जातं. हे प्रक्रिया बहुतेकदा गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांत होते. जर नियमित सोनोग्राफी नसेल तर कित्येक वेळा प्रेग्नंट महिलेला याबाबत माहितीही होत नाही.
दुसरं म्हणजे ह्यूमन काइमेरा हे खूप दुर्मिळ आहे. यात दोन भ्रूण सुरुवातीच्या अवस्थेतच एकत्र होतात. एकच शरीर पण दोन वेगवेगळे डीएनए सेट होतात. अशा व्यक्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे डीएनए असू शकतात.